Sanjay Dutt Latest News Sanjay Dutt Latest News
मनोरंजन

Sanjay Dutt : गांधी जयंतीच्या दिवशी संजय दत्तला आठवले बापू; शेअर केला व्हिडिओ

संजय दत्तची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे

सकाळ डिजिटल टीम

Sanjay Dutt Latest News गांधी जयंतीच्या दिवशी संजय दत्तने (Sanjay Dutt) लगे रहो मुन्ना भाई चित्रपटातील एक दृश्य शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याला सुरक्षा रक्षक थापड मारतो. हा संजय दत्तचा सुपरहिट चित्रपट होता. हा चित्रपट २००६ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट संजय दत्त आणि सुनील दत्त यांच्या मुन्ना भाई एमबीबीएस या चित्रपटाचा सिक्वेल होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले.

संजय दत्तने शेअर केलेला लगे रहो मुन्ना भाई चित्रपटातील दृश्य ज्यामध्ये एक सुरक्षा रक्षक संजू बाबाला थापड मारतो. यावर सर्किट लगेच रागाने गार्डच्या दिशेने जातो. परंतु, संजय दत्त (Sanjay Dutt) त्याला थांबवतो. बापूंची शिकवण लक्षात ठेवून संजय दत्त म्हणतो की, जेव्हा कोणी एका गालावर थापड मारेल तेव्हा दुसरा गाल त्याच्याकडे करावा.

परंतु, सुरक्षा रक्षक संजय दत्तच्या दुसऱ्या गालावरही थापड मारतो. यानंतर संजय दत्त क्षणभर विचार करतो आणि गार्डच्या गालावर थापड मारतो. त्यानंतर संजय दत्त सर्किटला समजावून सांगतो की, जेव्हा त्याने दुसऱ्या गालावर थापड मारली तेव्हा बापूंनी काय करावे हे सांगितले नाही.

संजय दत्तची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. लोक कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, बाबा तुम्ही अप्रतिम आहात. दुसऱ्याने लिहिले, बाबा तुम्ही नेहमी रागात असता. सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानी यांनी कमेंट सेक्शनमध्ये हार्ट इमोजी टाकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : कुख्यात अमन साहू टोळीचा सदस्य सुनीलकुमारला अझरबैजानमधून भारतात परत आणण्यात यश

एकल फौज आणि विसंगतीपूर्ण हिंसा

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

Sunday Special Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात बनवा चवदार ब्रेड पिझ्झा, लगेच नोट करा रेसिपी

दैव की कर्म?

SCROLL FOR NEXT