hera pheri 3 Sakal
मनोरंजन

Hera Pheri 3: आता मिळणार मनोरंजनाचा वाढिव डोस...हेरा फेरी 3 मध्ये चौथ्या पात्राची एन्ट्री

हेरा फेरी 3 चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट सतत चर्चेत आहे. चित्रपटाशी संबंधित काही माहिती सातत्याने समोर येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

अक्षय कुमारच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'हेरा फेरी 3' बद्दल अनेकदा काही अपडेट्स समोर येतात. सध्या हा चित्रपट मुख्य स्टारकास्टच्या चर्चेत आहे. चित्रपटाचा तिसरा भाग अक्षय कुमारला घेऊनच बनवला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.

चित्रपटातील महिला कलाकारांबाबत काही नावे समोर आली आहेत. आता आणखी एक नाव समोर आलं आहे, जो चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

हेरा फेरी 3 चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट सतत चर्चेत आहे. चित्रपटाशी संबंधित काही माहिती सातत्याने समोर येत आहे. नुकतीच बातमी आली होती की या चित्रपटाचे टायटल 'हेरा फेरा 3' नसून 'हेरा फेरी 4' असेल.

आता या चित्रपटातील खलनायकासाठी एका मोठ्या कलाकाराला अप्रोच करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. हेरा फेरी ३ मध्ये संजय दत्तची एन्ट्री झाल्याचे वृत्त आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय दत्त नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. मात्र, या प्रकरणाबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. संजय दत्तसोबतच त्याचा 'मुन्नाभाई एमबीबीएस'चा को-स्टार अर्शद वारसीचीही चर्चा आहे.

या चित्रपटात संजय दत्त एका खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे, जो पाहू शकत नाही, असे बोलले जात आहे. असे म्हणता येईल की जर तसे असेल तर त्याचे पात्र खूपच विचित्र असणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'हेरा फेरी'च्या या फ्रँचायझीसाठी दिशा पटनी, रश्मिका मंदान्ना आणि क्रिती सेनॉनला घेतले जाऊ शकते. मात्र, महिला कलाकारांबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. निर्मात्यांनी अद्याप अंतिम नावावर शिक्कामोर्तब केलेले नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT