Sanjay-Maanayata Wedding Anniversary esakal
मनोरंजन

Sanjay Dutt Wedding Anniversary: 'हॅप्पी ॲनिव्हर्सरी मॉम', संजूबाबानं बायकोला दिल्या जगावेगळ्या शुभेच्छा!

सध्या संजय दत्तची इंस्टावरील एक पोस्ट चर्चेत आली आहे. आज संजूबाबाच्या लग्नाच्या वाढदिवस आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Sanjay-Maanayata Wedding Anniversary : कुणी काही का म्हणेना पण आपल्याला जे योग्य वाटतं, भावतं ते बिनधास्तपणे करण्यात जे बॉलीवूड सेलिब्रेटी आहेत त्यात संजय दत्तचं नाव घ्यावं लागेल. त्यानं त्याच्या तीन दशकांहून अधिक काळच्या प्रवासात स्वताच्या नावाची वेगळी वाट तयार केली आहे.

संजय दत्तचा बॉलीवूडमधील आणि वैयक्तिक आय़ुष्यातील प्रवास हा खडतर राहिला आहे. त्याचं ते वादळी आयुष्य अनेकांसाठी चर्चेचा विषय राहिला आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या संजू नावाच्या चित्रपटातून या साऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. त्यातून त्यांनी संजय दत्त हे काय रसायन आहे हे प्रभावीपणे सांगण्यात आले आहे.

सध्या संजय दत्तची इंस्टावरील एक पोस्ट चर्चेत आली आहे. आज संजूबाबाच्या लग्नाच्या वाढदिवस आहे.त्यानिमित्तानं पत्नी मान्यताला दिलेल्या शुभेच्छा हा त्याच्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय आहे. संजू बाबा जे काही करतो ते त्याच्या चाहत्यांसाठी नेहमीच स्पेशल असतं. त्याचा प्रत्यय आताही दिसून आला आहे.त्यानं मान्यतासाठी शेयर केलेली ती पोस्ट प्रतिक्रियेचा विषय आहे. (Sanjay Dutt-Maanayata Dutt Wedding Anniversary)

संजय दत्त आणि मान्यता हे त्यांच्या लग्नाचा १६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्या निमित्तानं चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केल्याचे दिसून आले आहे. संजू बाबानं त्याच्या हटके स्टाईलनं मान्यताला शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाला संजू बाबा?

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई...माझ्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग तू झालीस त्यासाठी तुला खूप खूप धन्यवाद. मला जी दोन मुलं आहेत त्यासाठीही तुला धन्यवाद. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आई. जोपर्यत मी जगात असेल तोपर्यत मी तुझ्यासोबत असेल. अशा शब्दांत संजूनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ज्या चर्चेचा विषय आहेत.

११ फेब्रुवारी २००८ रोजी संजय दत्त आणि मान्यता दत्त यांनी लग्न केले होते. आज त्यांच्या लग्नाचा १६ वा वाढदिवस आहे. या निमित्तानं संजय दत्तनं त्याच्या इंस्टा अकाउंटवरुन खास पोस्ट शेयर केली असून त्याची चर्चा होताना दिसत आहे. त्यात त्यानं काही फोटो देखील शेयर केले आहेत. त्यासोबतच बाबानं वेलकम ३ असेही म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

Mumbai News: उलट्यांचा भीषण परिणाम! दोन महिने वेदना, अखेर जीवदान; आधुनिक उपचारांनी अन्ननलिकेचे छिद्र भरले

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

कर्जत, लोणावळा अलिबागमध्ये आमचे १०० पेक्षा जास्त बंगले; मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, कसा सांभाळते बिझनेस?

SCROLL FOR NEXT