Sanjay Dutt, Tiger Shroff Roped In For Upcoming Bollywood Action-Comedy Movie Master Blaster with Firoz Nadiadwallah Esakal
मनोरंजन

Master Blaster: अ‍ॅक्शनसोबतच कॉमेडीचा तडका...संजूबाबा अन् टायगरचा 'मास्टर ब्लास्टर'!

Vaishali Patil

Bollywood Action-Comedy Movie: अ‍ॅक्शन-कॉमेडी चित्रपटांसाठी ओळखले जाणारे फिरोज ए. नाडियादवाला हे लोकप्रिय चित्रपट निर्माते म्हणुन ओळखले जाते. 'हेरा फेरी', 'फिर हेरा फेरी', 'आवारा पागल दीवाना' आणि 'वेलकम' यांसारख्या फ्रेंचायझींनसाठीही ते प्रसिद्ध आहेत.

आता पुन्हा फिरोज अ‍ॅक्शन-कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी सज्ज झाला आहे. फिरोजच्या आगामी कॉमेडी-अ‍ॅक्शन चित्रपटाचे नाव देखील समोर आले आहे. त्याचे नाव आहे 'मास्टर ब्लास्टर'. तर या चित्रपटासाठी स्टारकास्टही तितकिच तगडी घेण्यात आली आहे.

'मास्टर ब्लास्टर' चित्रपटात संजय दत्त आणि टायगर श्रॉफ हे दोन्ही कलाकार अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे. संजय दत्त आणि टायगर श्रॉफ पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.

चित्रपट समीक्षक आणि चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी X वर या चित्रपटाबाबत माहिती दिली आहे. त्यांनी या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'संजय आणि टायगर फिरोज नाडियादवालाच्या 'मास्टर ब्लास्टर' या पुढील अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपटासाठी एकत्र येणार आहे. या बातमीला अधिकृतपणे पुष्टी मिळाली आहे. चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शनचे काम जवळपास पूर्ण झालं असून लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.

'मास्टर ब्लास्टर' या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग हाँगकाँग, मकाऊ आणि मेनलँड चीनमध्ये करण्यात येणार आहे. यात संजय आणि टायगर या दोघांनीही त्यांच्या भूमिकांच्या तयारीसाठी प्रख्यात शाओलिन मास्टरच्या मार्गदर्शनाखाली मार्शल आर्ट्सचे कठोर प्रशिक्षण घेतले आहे.

जॅकी श्रॉफसोबत 'खलनायक' आणि 'कारतूस' सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर, संजय दत्त आता पहिल्यांदाच त्याचा मुलगा टायगर श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात आणखी कोणते कलकार असतील आणि कोणती अभिनेत्री असेल याबाबत काही खुलासा करण्यात आलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup Contamination : ...तर वाचला असता निष्पाप बालकांचा जीव; कफ सिरप कंपनीने केले ३५० बाबींचे उल्लंघन, अहवालात धक्कादायक माहिती समोर

Navid Mushrif Vs Shoumika Mahadik : गोकूळ दूध संघाकडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर गंडवा गंडवीची चलाखी, प्रकरण अंगलट येणार?

Flight Ticket Price Hike: प्रवाशांच्या खिशाला फटका! दिवाळीपूर्वी रस्तेसह हवाई वाहतूक सेवा महागली; काय आहेत दर?

ऑनलाइन गेममध्ये ५० लाख गेले, दागिने चोरताना पाहिल्यानं आईला लेकानेच संपवलं; स्क्रू ड्रायव्हरने गळ्यावर वार

Panic & Heart Attack Difference: हार्ट अटॅकची लक्षणे 'दिसतात' पॅनिक अटॅकसारखीच! डॉक्टरांनी सांगितली फरक ओळखण्याची सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT