Sanjay Dutt wife maanyata Dutt special post for KGF Chapter 2 Movie.
Sanjay Dutt wife maanyata Dutt special post for KGF Chapter 2 Movie. Google
मनोरंजन

KGF Chapter 2 पाहिल्यावर संजय दत्तला बॅड बॉय म्हणणाऱ्यांना मान्यताचा सल्ला

प्रणाली मोरे

२०२२च्या बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक म्हणजे kGF Chapter 2 सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे आणि सिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या सिनेमात कन्नड सिनेमाचा सुपरस्टार यश रॉकी भाईच्या लीड रोलमध्ये आहे आणि त्याला आव्हान देत सिनेमात समोर उभा ठाकलाय संजय दत्त(Sanjay Dutt). kGF Chapter 2 या सिनेमाच्या कथानकात या दोन मुख्य व्यक्तीरेखांची एकमेकांसोबतची टक्कर आणि दुश्मनी दाखवण्यात आली आहे.

या सिनेमाशी संजय दत्तच्या काही आठवणी जोडल्या गेल्यात त्यामुळं तो त्याच्यासाठी खूप खास आहे असं म्हटलं जात आहे. या सिनेमाचं शूटिंग संजयनं तेव्हा केलं होतं जेव्हा तो कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढा देत होता. पण कॅमेऱ्यासमोर ज्या पद्धतीनं संजय वावरलेला दिसत आहे त्यावरनं हा अंदाज मुळीच लागत नाही की संजयन इतक्या कठीण अवस्थेत सिनेमाचं शूटिंग केलं होतं. आता हा सिनेमा संजयची बायको मान्यता दत्तने देखील पाहिला आहे,आणि ती म्हणे सिनेमा पाहून खूप भावूक झाली होती. तिनं संजयवर अनेक बाबतीत टीका-टीपण्णी करणाऱ्यांना KGF Chapter-2 हा सिनेमा आवर्जुन पहा असं म्हटलं आहे.

Manyata Dutt Instagram Post Image

मान्यता दत्त पोस्टच्या माध्यमातून म्हणाली आहे,'' या सिनेमाचा प्रवास आमच्यासाठी अनेक बाबतीत खास ठरलाय. ज्या लोकांनी अनेकदा संजयला बॅड बॉय, जबाबदारीची जाणीव नसलेला,कसलीच चिंता-काळजी न करणारा म्हणून नावं ठेवली आहेत त्यांनी संजयचा हा सिनेमा पहायला हवा. संजयनं आपल्या आयुष्यातील अतिशय कठीण काळात या सिनेमाचं शूटिंग केलं आहे. कुठलीही तक्रार न करता,कशाचीही पर्वा न करता नेहमीच्या ताकदीनं,जोशानं सिनेमातील अनेक कठीण सीन शूट केले आहेत. माझ्यासाठी तोच सिनेमाचा हिरो आहे. शांत, ताकदवान,उत्साही आणि शेवटपर्यंत लढणारा... KGF Chapter 2 अधिराचा सिनेमा आहे. या सिनेमामुळे संजय दत्तनं दमदार एन्ट्री इंडस्ट्रीत केली आहे''. मान्यता दत्तनं 'आ रहा हूं मै' म्हणत आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून संजच्या सिनेमातील परफॉर्मन्सची प्रशंसा केली आहे.

महत्त्वाचं म्हणजे,या सिनेमासाठी मान्यताने संजय दत्तला तयार केलं होतं. संजय दत्तनं देखील आपल्या मुलाखतीत तसं सांगितलं होतं की मान्यतानं देखील त्याच्यासोबत या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली आहे. KGF Chapter-2 नंतर संजय दत्त पृथ्वीराज,बिनॉय गांधी दिग्दर्शित घुडचढी,शमशेरा,तुलसीदास ज्युनियर मध्ये दिसणार आहे. शमशेरा मध्ये संजय दत्त रणबीर कपूरसोबत दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : हेमंत करकरेंवर गोळ्या झाडल्या कोणी? ; प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना सवाल

आजचे राशिभविष्य - 12 मे 2024

Mothers Day 2024Mothers Day 2024 : मदर्स डेची सुरूवात जिने केली तिलाच तो बंदही करायचा होता? कारण...

Hail Warning : पुणे जिल्ह्यात आज गारपिटीचा इशारा ; कमाल तापमानाचा पारा ३७.८ अंशांपर्यंत खाली

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 12 मे 2024

SCROLL FOR NEXT