Sanjay-Dutt 
मनोरंजन

संजय दत्तचे मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल!

सकाळ डिजिटल टीम

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेले चित्रपट दिलेला लोकप्रिय व रसिकांचे भरभरून प्रेम मिळालेला सुपरस्टार संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता यांनी आता मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. ते ‘बाबा’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘संजय एस दत्त प्रॉडक्शन्स’खाली त्यांनी अशोक सुभेदार व आरती सुभेदार यांच्या ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’ बरोबर त्यांनी चित्रपटाची सह-निर्मिती केली आहे.

‘बाबा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर निर्मात्यांनी प्रकाशित केले. हा चित्रपट 2 ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

‘बाबा’मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रशिक्षण घेतलेला आणि ‘तनु वेडस मनु’ मध्ये प्रमुख भूमिका बजाविलेला दीपक दोब्रियाल मुख्य भूमिकेत असेल. त्याचाही हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. नंदिता धुरी पाटकरसुद्धा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि लोकप्रिय बालकलाकार आर्यन मेंघजी यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केले आहे. ते ‘बकेट लिस्ट’चे सह-दिग्दर्शक होते. त्यांनी ‘धागा’ या मराठी लघुपटाचे ‘झी५’साठी दिग्दर्शन केले होते.

संजय दत्त यांनी ट्विट करून आपले वडील आणि महान कलाकार सुनील दत्त यांना हा चित्रपट समर्पित केला आहे. "आमचा पहिला मराठी चित्रपट 'बाबा' जी माझ्या मागे प्रत्येक बाबतीत खंबीरपणे उभी राहिली अशा व्यक्तीस समर्पित करत आहोत. लव्ह यू डॅड!," संजय म्हणतो.

मान्यता दत्तने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, "आमचा पहिला मराठी चित्रपट 'बाबा' आम्ही सुनील दत्त साहेबांना समर्पित करत आहोत. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे आमचा आत्मविश्वास नेहमीच द्विगुणित होत गेला."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balumama Temple Admapur land Scam : लाखात घेतली, कोट्यवधींना देवस्थानला विकली; बाळूमामा ट्रस्ट जमिनीत 11 कोटींचा गैरव्यवहार, पाच मध्यस्थींना केली अटक

Ganesh Procession : साउंड सिस्टीमच्या ट्रॅक्टर मालकास; एक वर्ष कारावासासह ३० हजारांचा दंड

Shiv Sena Political Clash : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी 'युद्ध'; दिशा सालियन प्रकरणाला 'गद्दारी'वरून प्रत्‍युत्तर, वादग्रस्त विषयांना पोलिस परवानगीने आश्चर्य

Latest Marathi News Live Update : निटचा निकाल जाहीर

Kagal Woman Dead Body : कागलमध्ये हाय व्होल्टेज टॉवरला महिलेचा मृतदेह; अनोळखी महिलेने ओढणीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज

SCROLL FOR NEXT