kgf sanjay
kgf sanjay 
मनोरंजन

संजय दत्तने 'केजीएफ २'चं शूटींग संपवलं, सेटवरचे फोटो व्हायरल

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- साऊथ सुपरस्टार यशच्या आगामी 'केजीएफ २' सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमामध्ये बॉलीवूड अभिनेता संजय दत्त देखील दिसून येणार आहे. या सिनेमात संजय दत्त अधिसची भूमिका साकारणार आहे. संजय दत्त आणि यश यांच्या या मोस्ट अवेटेड सिनेमाच्या सेटवरील काही फोटो आता समोर आले आहेत. 'केजीएफ २' चं शूटींग गेल्या अनेक दिवसांपासून हैद्राबाद येथील फिल्मसिटीमध्ये सुरु होतं. इथे सिनेमाचा मुख्य क्लायमॅक्स शूट केला जात होता ज्याची शूटींग आता पूर्ण झाली आहे. 

'केजीएफ २' च्या क्लायमॅक्सची शूटींग पूर्ण झाल्यानंतर दिग्दर्शक प्रशांत नील यांनी त्यांच्या ट्विटरवरुन लोकेशनचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये संजय दत्त आणि यश एकमेकांसोबत दिसत आहेत. तर सिनेमाची मोठी टीम देखील या फोटोंमध्ये दिसून येतेय. संजय दत्त या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारतोय. त्यामुळे संजूबाबाचे चाहते त्याचा हा नवीन अवतार पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 

सेटवरील हे फोटो शेअर करताना दिग्दर्शक प्रशांत नील यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिलंय, ''हे अगदी जबरदस्त रोमांचकारी, वेडेपणा आणि मस्तीने परिपूर्ण असण्याशिवाय दुसरं काही नाहीये. संपूर्ण टीमने उत्तम काम केलं. संजय दत्त ख-या आयुष्यातील योद्धा आहे. यशसोबत काम करणं एका ट्रिटपेक्षा कमी नाहीये. आनंदाने भरलेला, क्लायमॅक्स पूर्ण केला. संपूर्ण जगासोबत केजीएफ चॅप्टर २ पाहण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही.''दिग्दर्शक प्रशांत नील यांनी ८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजून १८ मिनिटांनी या मोस्ट अवेटेड सिनेमाचा टिझर रिलीज करणार असल्याची देखील नुकतीच घोषणा केली आहे.   

sanjay dutt wraps up kgf chapter 2 shooting bts photos viral  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच! न्यायालयीन कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT