Sanjay Kapoors daughter Shanaya Kapoor has featured in a new photoshoot 
मनोरंजन

संजय कपूरच्या मुलीचं फोटोशुट पाहिलयं, नादखुळा...

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  बॉलीवूड मध्ये आपल्या नावानं नव्हे तर भावाच्या नावामुळे अधिक प्रसिध्द असणा-या अभिनेता संजय कपूरच्या हाती फारसं यश काही आले नाही. त्यानंतर तो बिझनेस आणि निर्माता म्हणून काम करु लागला. गेल्या काही वर्षांत त्य़ाने वेबमालिकांमध्येही काम केले होते. पण ते ही थोडेच. आता त्याची मुलगी बॉलीवूडमध्ये येऊ पाहते आहे. तिनं जे फोटोशुट केले आहे ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.

शनाया ही अभिनेता संजय आणि महदीप कपूर यांची मुलगी आहे. ती आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिचं एक फोटोशुट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे ती भलतीच चर्चेतही आली आहे. तिनं ते फोटोशुट सोनम कपूर, जान्हवी कपूर यांनाही शेयर केलं आहे. मेक अप आर्टीस्ट रिध्दीमा शर्मा हिनं काही फोटो व्हायरल केले आहेत. त्यात शनायानं नुकतेच फोटोशुट केल्याचे दिसून आले आहे. तिनं निळ्या रंगाचा एक सुट घातला आहे. त्यात ती हॉट दिसत आहे.

एकप्रकारे बोल्ड फोटोशुट म्हणता येईल असा अंदाज शनायाच्या त्या फोटोंमध्ये आहे. ब्राऊन कलरचा जंम्पसुट आहे. मेटॅलिक मेकअप, केसं मोकळी सोडली आहेत. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये तिनं फारशे एक्सप्रेशन्स दिलेले नाहीत. शनायानं The Fabulous Lives of Bollywood Wives या वेबसीरिजच्या माध्यमातून पदार्पण केले आहे. त्यात पॅरिसमधल्या एका फॅशनमध्ये ती सहभागी झाल्याचे दाखविण्यात आले आहे. तसेच ती संजय बरोबर बॉल डान्स करतानाही दिसली आहे. आपण अशाप्रकारे बॉल डान्स करताना थोडं चिंताग्रस्त असल्याचे तिनं सांगितले.

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, हे माझ्यासाठी फारच अवघड असे काम होते. ते करताना माझ्यावर दडपणही होते. मात्र माझे सहाय्यक दिग्दर्शक यांनी मला महत्वाचे मार्गदर्शन केलं. त्याचा फायदा मला झाला. आता शिकण्याची पायरी आहे. अशावेळी झालेल्या चूका सुधारण्याची संधी मिळते. शनायानं जान्हवीला तिच्या गुंजन द कारगील गर्ल या चित्रपटासाठी असिस्ट केले होते. शनायाला अॅक्टिंग स्कूलमध्ये जाण्यात फारसा रस नाही. असे तिचे वडिल संजय य़ांनी एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT