Gangubai Kathiyawadi Movie News 
मनोरंजन

Gangubai Kathiawadi: अखेर गंगुबाई येणार प्रेक्षकांच्या भेटीला; प्रदर्शनाची तारीख जाहीर

या चित्रपटात आलिया भट्टची मध्यवर्ती भूमिका असून ती गंगुबाई काठियावाडी हे पात्र साकारतेय.

स्वाती वेमूल

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित 'गंगुबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख अखेर जाहीर झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोना आणि लॉकडाउनमुळे प्रदर्शनाची तारीख सतत पुढे ढकलली जात होती. आता हा चित्रपट येत्या २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मार्च २०२० पासून या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं जात होतं. या चित्रपटात आलिया भट्टची (Alia Bhatt) मध्यवर्ती भूमिका असून ती गंगुबाई काठियावाडी हे पात्र साकारतेय. (Gangubai Kathiyawadi Release Date Confirm)

आलियाच्या करिअरमधील हा पहिलाच बायोपिक आहे. याचसोबत तिचा भन्साळींसोबतचा हा पहिलाच चित्रपट आहे. ट्रेलरमधील तिचा लूक, तिचं अभिनय अगदी नजरेत भरणारं असल्याने सोशल मीडियावर त्याची जोरदार झाली. आलियाला गंगुबाईंच्या भूमिकेत पाहणं ही प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणीच असेल. (Gangubai Kathiyawadi Movie News)

कोण होत्या गंगुबाई काठियावाडी?


हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकातून भन्साळींना गंगूबाई हे पात्र सापडलं. गंगुबाई या कामाठीपुरात वेश्या व्यवसाय करत होत्या. त्या मूळच्या गुजरातच्या होत्या. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी प्रेमविवाह करून त्या मुंबईत पळून आल्या होत्या. मात्र त्यांच्या पतीने केवळ ५०० रुपयांसाठी त्यांना वेश्या व्यवसायात ढकललं. कामाठीपुरात वेश्या व्यवसाय करताना गंगुबाईंचा अनेक गँगस्टरशी संपर्क आला. अशाच एका प्रसंगात त्यांची गाठ करीम लाला यांच्याशी पडली आणि त्यांनी त्याला राखी बांधत भाऊ मानलं. त्या घटनेनंतर करीम लालाने अवघा कामाठीपुराच गंगुबाईच्या हातात दिला, असं म्हटलं जातं. गंगुबाईंनी वेश्या व्यवसाय केला, मात्र त्यांनी कधीही कोणत्याही मुलीच्या इच्छेविरोधात तिला हा व्यवसाय करू दिला नव्हता, असंसुद्धा सांगितलं जातं. इतकंच नव्हे तर जेव्हा मुंबईतून वेश्या व्यवसाय काढून टाकण्यासाठी प्रयत्न सुरू झाले तेव्हा त्या आंदोलनाच्या नेतृत्वासाठी गंगुबाईंनी पुढाकार घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT