Heeramandi Firs look Esakal
मनोरंजन

Heeramandi: मामाचं भाचीला मोठ सरप्राईज, ९४ किलो वजन कमी करायला लावलं अन् चक्क हिरामंडीत.....

सकाळ डिजिटल टीम

संजय लीला भन्साळी हे बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट 'हीरामंडी' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. फर्स्ट लूक पाहिल्यानंतर सोशल मिडियावर याचीच चर्चा आहे. लोक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये याचा फर्स्ट लूक समोर आला असून त्यासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ज्यामध्ये मनीषा कोईराला,सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी,रिचा चड्ढा,संजीदा शेख,या सगळ्यांचा रॉयल लूक समोर आला आहे. मात्र या आघाडीच्या अभिनेत्रींसोबतच आणखी एक ओळखीचा चेहरा आपल्याला दिसला तो म्हणजे अभिनेत्री शर्मिन सहगल चा. ती संजय लीला भन्साळी यांची भाची आहे.

शर्मीनने 'मलाल' चित्रपटातून अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. शर्मीन या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे कारण ही भूमिका तिच्या आधीच्या चित्रपटाच्या भुमिकेपेक्षा खूप वेगळी आहे. शर्मीन आज खूप ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे. सर्वांच्या नजरा तिच्यावर टिकून आहेत. पण ती नेहमीच अशी नव्हती. वयाच्या 17 व्या वर्षी तिचे वजन 94 किलो होते आणि त्यामुळेच तिची खूप खिल्ली उडवली जायची.

शर्मीनने सांगितले की तिला डॉक्टर व्हायचे होते पण कॉलेजमध्ये जेव्हा तिने थिएटर सुरू केले तेव्हा तिला अभिनयात आवड निर्माण झाली. त्यावेळी तिचे वजन 94 किलो असल्यानं बरेच लोक तिला चिडवत होते. शर्मीन म्हणाली की, त्यावेळी ती अभिनेत्री होण्याचा विचारही करू शकत नव्हती कारण चित्रपटसृष्टीत तुमचा लुक खूप महत्त्वाचा असतो.

शर्मीनने सांगितले की, तिने संजय लीला भन्साळी यांची सहाय्यक दिग्दर्शक केलं आहे. शर्मीनने राम लीला आणि बाजीराव मस्तानीच्या वेळी संजय लीला भन्साळींना सहाय्यक दिग्दर्शक केलं होतं. इतकेच नाही तर शर्मीन मैरी कॉमही जोडली गेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

Latest Marathi News Update : वाशिम-कारंजा मार्गावर CNG गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील सिलेंडरचा स्फोट; जीवितहानी टळली

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

SCROLL FOR NEXT