https://www.esakal.com/manoranjan/sukanya-mone-emotional-birthday-post-for-her-daughter-julia-mone-drj96 
मनोरंजन

Sukanya Mone - Sanjay Mone: "तर आपण एकमेकांना विसरुन जाऊ", लग्नापुर्वीच संजय मोनेंनी सुकन्याला सांगून टाकलं

संजय - सुकन्या एका मुलाखतीत हा खुलासा केलाय

Devendra Jadhav

Sukanya Mone - Sanjay Mone News: सुकन्या मोने - संजय मोने ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील जोडी. संजय मोने आणि सुकन्या मोने यांचा मिश्किल स्वभाव सर्वांना माहितच आहे.

सुकन्या मोने आणि संजय मोने हे गेली अनेक वर्ष नाटक, मालिका आणि सिनेमांच्या माध्यमातुन प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अलीकडेच एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत संजय - सुकन्या यांनी एक मोठा खुलासा केलाय.

संजय - सुकन्या यांच्या नात्यात एक वेळ अशी आली होती की, आज दोघेही एकमेकांशी लग्नबंधनात अडकले नसते. काय झालं होतं जाणुन घेऊ.

(Sanjay Mone told wife Sukanya Mone wedding story)

संजय मोने यांनी मुलाखतीत खुलासा केला की, "मी तुझ्या घरच्यांना येऊन तुझ्या आईवडिलांना आपल्या लग्नाबद्दल सांगणार नाही. कारण ते माझे आई-वडिल नाही ते तुझे आहेत. मी माझ्या आई - वडिलांना सांगेल. त्यात विरोध झाला तर विसरुन जायचं. संपलं.

संजय - सुकन्या पुढे म्हणाले, "पळुन जाउन लग्न करायच शक्यच नाही. कारण मी आठवड्यातुन तीन वेळा पळुन जातच होतो ना मी नाटकाच्या दौऱ्यावर."

संजय मोने पुढे म्हणाले, "जसे मला माझे आई - वडिल हवे आहेत. तसेच तुझेही तुला प्रिय आहेत. मी माझ्या आई वडिलांना दुखावुन काय करणार नाही. तसंच तुही करु नकोस. त्यापेक्षा आपण थांबुया, पळुन जायचं नाही. जेव्हा ते हो म्हणतील तेव्हा लग्न करु. आधीच उशीर झालाय तर अजुन थोडा उशीर."

संजय मोने - सुकन्या मोने यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर... सुकन्या मोने काहीच महिन्यांपुर्वी रिलीज झालेल्या बाईपण भारी देवा सिनेमात झळकल्या. या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत सर्वांचं मन जिकलं.

संजय मोने यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर... संजय मोने काहीच दिवसांपुर्वी प्रतिशोध या मराठी मालिकेत झळकले. संजय - सुकन्या आजवर एकमेकांच्या करिअरला सपोर्ट करताना दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनर किलिंगने हादरलं सूर्यापेट! आंतरजातीय प्रेमविवाहामुळे युवकाची क्रूरपणे हत्या; पत्नी म्हणाली, 'मी स्वप्नातही देखील..'

Satara Crime: 'वेळेनजीक सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याला लुटले; वीस लाख लंपास, अपहरण करून पाय बांधले अन्..

Chandu Chauhan : ‘सर्जिकल स्ट्राइक’मधील वादग्रस्त चंदू चव्हाण अटकेत; पोलिसांवर गंभीर आरोप

Latest Marathi News Updates : खासदार बजरंग सोनवणेंच्या समर्थकांचं 'बंदूक फोटोशूट', ‘शो ऑफ’ चांगलंच अंगलट आलं, गुन्हा दाखल

पाय फ्रॅक्चर झाल्यावरही नृत्याच्या कार्यक्रमासाठी जिद्दीने उभी राहिली अभिनेत्री; "फक्त मनात ठरवता.."

SCROLL FOR NEXT