Sanju Box Office Collection Day 2
Sanju Box Office Collection Day 2 
मनोरंजन

दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर 'संजू' हिट

वृत्तसंस्था

मुंबई- बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित झाला आणि चित्रपटाला या वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंग मिळाली. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जोरदार कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशीही हा चित्रपट हिट ठरला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी मिळून 73.35 कोटी रुपयांचा गल्ला या चित्रपटाने जमवाला आहे. पहिल्या दिवशी जवळपास 35 कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी (ता.30) या चित्रपटाने जवळपास 38 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

या वर्षातील या चित्रपटाने रेस 3, पद्मावत, बागी 2 यां चित्रपटांना मागे टाकत यांच्यापेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. रविवारपर्यंत हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा आरामात पार करेल असं मत चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी मांडलं आहे.

दरम्यान, दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित 'संजू' चित्रपट शुक्रवारी (ता.29) प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने साकारली असून, संजय दत्तच्या आयुष्यात नेमके काय घडले याची सत्यकथा या चित्रपटातून उतरवण्याचा प्रयत्न राजकुमार हिरानी यांनी केला. या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित माहिती देण्यात आली आहे. संजय दत्त जसा होता, अगदी तशीच बाजू या चित्रपटात दाखवण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसह अभिनेता परेश रावल, अनुष्का शर्मा, विकी कौशल, दिया मिर्झा, सोनम कपूर, करिश्मा तन्ना आणि मनिषा कोईराला यांच्या भुमिका आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT