sankarshan karhade share experience of flight travel with pilot at ohio  SAKAL
मनोरंजन

Sankarshan Karhade: "पायलटच्या केबिनमध्ये शिरलो आणि मग पुढे...", संकर्षणचा विमान प्रवासाचा भन्नाट अनुभव

संकर्षणने विमान प्रवास करण्याआधी थेट पायलटच्या केबिनमध्ये प्रवेश केला

Devendra Jadhav

संकर्षण कऱ्हाडे हा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. संकर्षण कऱ्हाडे सोशल मिडीयावर अनेकदा त्याचे प्रवासाचे अनुभव सोशल मिडीयावर शेअर करत असतो.

संकर्षणने सोशल मिडीयावर विमान प्रवासाचा भन्नाट अनुभव शेअर केलाय. संकर्षणने दोन फोटो पोस्ट केलेत. यात तो पायलटच्या शेजारी बसलेला दिसून येतोय.

(sankarshan karhade share experience of flight travel with pilot at ohio)

संकर्षण अनुभव सांगताना लिहीतो, "“माझा हा अनुभव वेळ असेल तर; नक्की वाचा ..” कॅनसास सिटी हून क्लिव्हलॅंड ला जाण्यासाठी विमानांत शिरलो तर फार गर्दी नव्हती..
विमान ऊडतं कसं , कसं चालवतात, ह्याच्याविषयी मनांत कायम प्रश्नं पडलेले असतात म्हणुन दरवेळी मी विमिनांत बसतांना कुतूहलाने केबीनकडे बघतोच.. आजही तेच केलं..
तर; हे “पायलट साहेब” (आपल्याकडच्या ड्रायव्हर साहेब , कंडक्टर साहेब सारखं म्हणतोय) जरा मोकळे ढाकळे वाटले …. माझ्याकडे बघुन , स्वत:हून हसले ..

संकर्षण पुढे सांगतो, "आपल्याला “ऊडवून नेणारा पायलट” आपल्याला स्वत:हून स्माईल देतोय म्हणल्यावर हेच मोफत स्माईल दूपटीने परत करायला कसला भाव खायचा ..? म्हणुन मी त्यांच्यापेक्षा जास्तं मोकळा ढाकळा हसलो.. आणि त्याच्या केबीनकडे
“काय भाऊ ; येऊ का घरांत….??” च्या नजरेनेच पाहिलं .. त्यालाही ते कळलंच..
त्याने मग स्वत:हून “Welcome to my working area” असं म्हणाल्यावर मी फार फार खुष झालो गड्या.."

संकर्षण केबिनमधला अनुभव सांगताना लिहीतो, "पहिल्यांदाच विमानाच्या केबिनमध्ये पाय ठेवला.. जिथुन २००/३००/४०० लोकांना घेऊन हि विमानं ऊडत असतात…. खूप सारे बटन्स, पायलटची खुर्ची , माॅनिटर , टेक आॅफ लॅंडिंग ची ती दांडी .. मज्जा वाटली पाहातांना .. मला झालेला एकंदरीत आनंद पाहाता तो परत स्वतःहून म्हणाला ; “सिट देअर अॅंड क्लिक अ पिक्चर” …. मी पाहातच राहिलो .. मला प्रश्नं पडला कि , हा माझ्या चेहरऱ्यावरचा अती आनंद पाहून मनांत मला वेड्यात काढून माझी गंमत करतोय का ..?? मग मी जरा कंट्रोल्ड वागायची अॅक्टींग करत “No no .. Its ok….” वगैरे म्हणालो तर “कॅप्टन पिटर रसल भाऊंनी” आग्रहाने पायलट सिटवर बसवलं….. आणि माझा फोटो घेतला .. आर काय आनंद झाला म्हणुन सांगू ….?? मग प्रथेप्रमाणे त्”Can I click a Picture with you” असं वाक्यं कुणीतरी एकजण म्हणतंच .. ते मी म्हणालो आणि पिटर भाऊंसोबत फोटो काढला .."

संकर्षण शेवटी लिहीतो, "थोड्या गप्पा झाल्या , नंबर एक्सेंज झाले… अजुन जरावेळ एकत्रं घालवला असता तर ; तो तरी म्हणाला असता कि , “विमान चालवतोस का ..? किंवा मी तरी म्हणालो असतो “हो बाजूला मीच चालवतो….” पण त्याच्या आतच संभाषण थांबलं आणि मी माझ्या सिटवर येउन बसलो आणि पूर्ण प्रवासभर “आता तो हे बटन दाबत असेल …. आता तो स्पिकरवर बोलत असेल” असा विचार करत , आनंदात बसुन राहिलो ….
लोकंहो विचार करा …. जरा स्माईल दिलं , प्रेमानं बोललं कि , मनांत असलं ते सगळं होतंय ….
आज विमानाचं केबिन पाहिल्यामुळे मी मात्रं “हवेत आहे”."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT