sanskruti balgude and shubhankar tawde 8 don 75 marathi movie trailer SAKAL
मनोरंजन

Sanskruti Balgude: शुभंकर - संस्कृती बालगुडेच्या '८ दोन ७५' सिनेमाचा ट्रेलर रिलीज, या महत्वाच्या विषयाची मांडणी

संस्कृती बालगुडेच्या आगामी सिनेमातून महत्वाचा विषय समोर येणार आहे

Devendra Jadhav

मराठी मनोरंजन विश्वात सध्या विविध विषयांवरचे सिनेमे भेटीला येत आहेत. नवीन वर्षात सत्यशोधक, पंचक आणि ओले आले हे तीन सिनेमे रिलीज झाले. आता चित्रपटसृष्टीत "८ दोन ७५" निमित्ताने आणखी एक वेगळ्या विषयावरचा सिनेमा रिलीज होणार आहे. "८ दोन ७५" म्हणजे नक्की काय? हे या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल.

"८ दोन ७५" : फक्त इच्छाशक्ती हवी! हा चित्रपट देहदानासारख्या महत्त्वाच्या विषयावर बेतला आहे. देहदान केल्यास मृत्यूनंतर आपले अवयव अन्य गरजू रुग्णांच्या कामी येऊ शकतात हा विचार चित्रपटात अतिशय रंजक पद्धतीनं मांडल्याचे चित्रपटाच्या ट्रेलरमधून दिसतं. त्याशिवाय वैद्यकीय शिक्षणावरही या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे उत्तम स्टारकास्ट असलेला, महत्त्वाचा विषय मनोरंजक पद्धतीनं मांडणारा "८ दोन ७५": फक्त इच्छाशक्ती हवी! सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.

उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे आणि सुधीर कोलते यांनी ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाची निर्माती केली आहे, तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. शर्वाणी - सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथा लेखनाची, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे.

अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्यासह शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी पुष्कर श्रोत्री यांच्या चित्रपटात भूमिका आहेत.

वैभव जोशी यांनी गीतलेखन, अवधूत गुप्ते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये ९० पेक्षाही अधिक पुरस्कार या चित्रपटानं मिळवले आहेत. हा चित्रपट आता १९ जानेवारीला चित्रपटगृहात पाहता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे–पिंपरी चिंचवड–मुंबईत ओबीसी विद्यार्थ्यांची वाढती संख्या; वसतिगृह क्षमता तात्काळ वाढवावी; आमदार राहुल कुल यांची अधिवेशनात मागणी!

Pune News : पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पाणी नाही; आरक्षण १४.६१ वरून २२ टीएमसी करण्याची आमदार टिळेकर यांची विधानपरिषदेत ठाम मागणी!

IND vs SA, 1st T20I: भारताची टॉप-ऑर्डर फेल, पण हार्दिक पांड्याच्या वादळी फिफ्टीमुळे दक्षिण आफ्रिकेसमोर मोठं लक्ष्य

Pune Crime : अल्पवयीन मुलीला धमकावून वारंवार लैंगिक अत्याचार; आरोपीवर विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल!

Latest Marathi News Live Update: कोल्हापूरच्या सायबर चौकात पुन्हा अपघात

SCROLL FOR NEXT