Santosh Juvekar shared funny video of upcoming episode struggler saala sakal
मनोरंजन

Santosh Juvekar: हा असच बोलतो आणि आम्ही तापतो आणि मग.. संतोष आणि कुशाचा भन्नाट व्हिडिओ..

मित्रांनो येतोय स्ट्रगलर सालाचा नवा भाग..

नीलेश अडसूळ

Santosh Juvekar: झेंडा, मोरया, एक तारा आणि यासारखे कितीतरी चित्रपट गाजवलेला एक उत्तम अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. तो सोशल मिडियावरही बराच सक्रिय असतो. त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. संतोष अभिनया सोबत सामाजिक कामातही बराच सक्रिय असतो.

तो वैयक्तिक तसंच प्रोफेशनल आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करताना दिसत आहे. नुकतीच त्यानं एक व्हिडीओ शेअर केली आहे. ही व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. सोबतच त्याने एक भन्नाट कॅप्शन दिले आहे.

(Santosh Juvekar shared funny video of upcoming episode struggler saala)

संतोषने शेयर केलेल्या व्हिडीओ मध्ये, संतोष.. विजू माने आणि कुशल बद्रिके असे तिघे जन आहेत. यामध्ये विजू माने म्हणतात, आता माझे पाच लाख आहेत, पण मी उद्या दोन लाख द्यायला तयार आहे. दोन लाख ऐकताच संतोष आणि कुशल हादरतात आणि म्हणतात किती.. त्यावर विजू म्हणतात, दोन लाख..

मग संतोष म्हणतात, आर मग आम्हीच करतो ना.. त्यावर विजु म्हणतो.. अरे वसूली करणं तुमचं काम नाही.. त्यावर संतोष म्हणतो.. तु काय मना कमी समजलं का.. मिनी खारेगाव चा ह.. लय मोठी लफरी केलीयत मिनी.. हे ऐकून कुशललाही जोर चढतो.. आणि तो म्हणतो, मिनी पण अंबरनाथचा ह.. त्यावर संतोष म्हणतो.. बस तु नॉर्मल भाषेतच बोल..

हा विडिओ सोबत, संतोषने एक भन्नाट कॅप्शन दिले आहे. ''हा असच बोलतो आणि आम्ही तापतो आणि मग जे काय ल.....day लागतात ते बघा'' हा व्हिडिओ पाहून चाहते भरभरून हसले आहेत.

हा व्हिडिओ म्हणजे स्ट्रगलर साला या कॉमेडी वेब सिरिजचा प्रोमो आहे. लवकरच या सिरिजचा पाचवा भाग येत आहे.

विजू माने दिग्दर्शित आणि अभिनेता संतोष जुवेकर, कुशल बद्रिके आणि अभिजीत चव्हाण यांनी गाजवलेली 'स्ट्रगलर साला' ही मराठी यु ट्यूब सिरीज एक वेगळा प्रयोग ठरली. तरुणांची भाषा, थोडीशी चावट शैली आणि शिव्या असा बाज घेऊन या सिरीजचे तरुणांचे तुफान मनोरंजन केले. बघता बघता या सीरिजने दोन सीजन झाले.

या दोन्ही सीजन ला भरपूर प्रतिसाद मिळाला. आता याचा तिसरा सीजन जोरदार प्रतिसादात सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT