सान्या मल्होत्रा  
मनोरंजन

'दंगल' गर्ल सान्याने मुंबईत घेतला फ्लॅट, किंमत ऐकून विस्फारतील डोळे

जुहूच्या त्या इमारतीत हृतिक रोशनचे दोन फ्लॅट आहेत. त्याची किंमत १०० कोटी रुपये आहे.

दीनानाथ परब

मुंबई: 'दंगल' (Dangal) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री सान्या मल्होत्राने (Sanya Malhotra) जुहूमध्ये नवीन घर विकत (Juhu new flat) घेतलं आहे. जुहू-वर्सोवा लिंक रोडवर बेव्ह्यू इमारतीमध्ये (Bayview building) सान्याचा नवीन फ्लॅट आहे. मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, बिल्डर समीर भोजवानी यांच्या नावावर हा फ्लॅट होता. १४ ऑक्टोबरल २०२१ रोजी हे अपार्टमेन्ट सान्याच्या नावावर झाले.

याच बेव्ह्यू इमारतीमध्ये अभिनेता हृतिक रोशनचे दोन फ्लॅट आहेत. दंगल गर्ल सान्या मल्होत्राने जुहूमध्ये विकत घेतलेल्या या घराची किंमत ऐकून तुमचे डोळे विस्फारतील. सान्या आणि तिचे वडिल सुनील कुमार मल्होत्रा यांनी या फ्लॅटसाठी ७१.५ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली. या फ्लॅटची किंमत १४.३ कोटी रुपये आहे. याच इमारतीत मागच्यावर्षी हृतिक रोशनने १०० कोटी रुपये मोजून दोन फ्लॅट विकत घेतले होते. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

यापूर्वी सान्याने २०१८ मध्ये मुंबईत आलिशान फ्लॅट विकत घेतला होता. सान्या मूळची दिल्लीची आहे. तिला मुंबई शहर आवडते. मुंबई सुरक्षित शहर असून आपल्याला इथे वेगळ्या स्वातंत्र्याचा अनुभव मिळतो, असे सान्याने एका आघाडीच्या दैनिकाशी बोलताना सांगितले होते. दंगल, बधाई हो, पटाखा, शकुंतला देवी, ल्युडो या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. लवकरच ती करण जोहरच्या मीनाक्षी सुंदरेश्वर चित्रपटामध्ये दिसणार आहे. पाच नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT