Sapna Choudhary with Veer Sahu Google
मनोरंजन

हरयाणवी क्वीन सपना चौधरीचा पारा चढला; नवऱ्यालाच म्हणाली,'बेकार आहे हा'

सोशल मीडियावर सपनाचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून ,चाहत्यांनी त्यावर चिंता व्यक्त केली आहे.

प्रणाली मोरे

हरियाणवी क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री आणि डान्सर सपना चौधरी(Sapna Choudhary) आज एक मोठं चर्चेतलं नाव आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अभिनयासोबतच सपना सोशल मीडियावरही सक्रिय पहायला मिळते. अलिकडे तर तिचे हॉट फोटोज आणि व्हिडीओ रील्सनी तर इंटरनेटचं तापमान चांगलंच तापवलंय. याच दरम्यान सपनाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत ती आपला नवरा वीर साहू(Veer Sahu) वर चांगलीच भडकलेली दिसत आहे. सपनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा धो-धो पाऊस पडताना दिसत आहे. त्या व्हिडीओची लिंक आम्ही बातमीत जोडलेली आहे. नक्की पहा.

हरियाणवी क्वीन सपना चौधरीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सपना आपला नवरा वीर साहूसोबत एकदम देसी अंदाजमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकाल की सपना ट्रॅक्टरमध्ये बसून गावातील शेतांमध्ये फिरत आहे. पण तेव्हाच अचानक ती तिच्या नवऱ्यावर डाफरताना दिसत आहे. सपना म्हणतेय, ''माझा ड्रायव्हर बकवास आहे,माझा ड्रायव्हर बेकार आहे,माझा ड्रायव्हर बेवकूफ आहे. नीट पुढे बघून गाडी चालव. नाहीतर भाडं नाही देणार. माझ्या मुलाच्या पप्पा जरा बघून चालव''. यानंतर पुढे आपण व्हिडीओत पाहू शकताय की एक मोठी वस्तू ती आपल्या नाजूक हातांनी उचलायचा प्रयत्न करतेय पण तिच्यानं काही ते शक्य होत नाही.

नेहमीप्रमाणेच सपनाच्या या व्हिडीओला देखील तिच्या चाहत्यांनी पसंत केलं आहे. त्यावर प्रेमाचा वर्षाव करताना चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील नोंदवल्या आहेत. एकानं म्हटलं आहे,'आपला मोठा भाऊ वीर आणि सपना यांच्याकडून एक गोष्ट नेहमी शिकायला मिळते ती म्हणजे माणसानं किती मोठं झालं तरी संस्कृती आणि जन्मभूमी विसरता कामा नये'. तर दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं आहे,'सपनाजी आम्ही जमिनदार असेच असतो'. तर एकानं भन्नाट कमेंट लिहिली आहे. तो म्हणालाय,'ड्रायव्हर बदल दो'. व्हिडीओ पोस्ट झाल्यापासनं अनेकांनी हटके प्रतिक्रिया नोंदवलेल्या पहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT