Sara Ali Khan bollywood actress interview with  esakal
मनोरंजन

Sara Ali Khan : 'मला आंधळा, वेडा नवरा हवा! सारा असं का म्हणाली?'

प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिलनं सारा अली खानची मुलाखत घेतली असून त्यामध्ये तिनं तिच्या लग्नाविषयी खुलासा केला आहे.

युगंधर ताजणे

Sara Ali Khan On Her Wedding Plans : बॉलीवूडमध्ये आपल्या बोल्डनेसनं सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी सारा आता लग्नाच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. सध्या तिचा गॅसलाईट नावाचा चित्रपट चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सारा तिच्या चांगल्या हिट चित्रपटाच्या शोधात आहे. यापूर्वी तिच्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी प्रेक्षकांची नाराजी ओढावून घेतली आहे.

सारा आता २७ वर्षांची आहे. त्यात तिच्या लग्नाची चर्चा सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिलनं सारा अली खानची मुलाखत घेतली असून त्यामध्ये तिनं तिच्या लग्नाविषयी खुलासा केला आहे.यातून साराच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. सारानं जी प्रतिक्रिया दिली त्यावरुन तिच्यावर नेटकऱ्यांनी टीका सुरु केली आहे. सारा अली खान असं कसं बोलू शकते. असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

Also Read - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

लग्नं कधी करणार, यावर काय बोलून गेली सारा अली खान-

शहनाज गिलनं सारा अली खानला शेवटी तो प्रश्न विचारला ज्यावरुन अनेकजण तिच्या उत्तराची आतुरतेनं वाट पाहत आहेत. तुझ्या लग्नाचे प्लॅनिंग काय आहे यावर सारा म्हणाली, मी अजुन त्याचा काही विचार केलेला नाही. पण आता मला असा एखादा आंधळा नाहीतर वेडा माणूस शोधावा लागेल जो माझ्याशी लग्न करायला तयार असेल. सध्यातरी माझा शोध सुरु आहे. अशी प्रतिक्रिया सारानं दिली होती.

मी असं काही म्हणाले याचे कारण म्हणजे तो जर फार हुशार असला तर तो मला सोडून जाण्याची शक्यता अधिक आहे. याचे कारण त्याला मी काय आहे हे कळेल. मग बाकी बऱ्याचशा गोष्टींबाबत अडचणी होऊ लागतील. आंधळा असेल तर त्याला काय चालले आहे हे कळणार नाही. दुसरी गोष्ट त्याला काही माहितीही होणार नाही. मला सहन करणारं कुणी हवं आहे. अशा शब्दांत सारानं तिला हव्या असणाऱ्या पार्टनरविषयी सांगितलं आहे.

सारा अली खानचा गॅसलाईट नावाचा चित्रपट ३१ मार्च रोजी प्रदर्शित झाला असून त्याला म्हणावा असा प्रतिसाद मिळालेला नाही. या चित्रपटामध्ये सारा शिवाय प्रसिद्ध अभिनेत्री चित्रांगदा सिंह, विक्रांत मेस्सी, यांच्या मुख्य भूमिका आहे. या चित्रपटानंतर सारा जरा हटके जरा बचके, ए वतन मेरे वतन आणि मेट्रो इन दिनो सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT