Ae Watan Mere Watan 
मनोरंजन

Sara Ali Khan: "देश की कहानी, उषा की जुबानी"; सारा अली खानच्या 'ऐ वतन मेरे वतन' ची रिलीज डेट जाहीर

Sara Ali Khan: साराचा 'ऐ वतन मेरे वतन' (Ae Watan Mere Watan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

priyanka kulkarni

Sara Ali Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही तिच्या अभिनयानं आणि हटके अंदाजानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. साराचा 'ऐ वतन मेरे वतन' (Ae Watan Mere Watan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. आता या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. 'ऐ वतन मेरे वतन' हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे? जाणून घ्या...

कधी रिलीज होणार चित्रपट?

सारानं 'ऐ वतन मेरे वतन' या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "देश की कहानी, उषा की जुबानी, विश्व रेडियो दिवस पर! 'ऐ वतन मेरे वतन' हा चित्रपट अॅमेजॉन प्राइमवर 21 मार्चला रिलीज होणार आहे." सारानं शेअर केलेल्या पोस्टरवर नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

'ऐ वतन मेरे वतन' ची स्टार कास्ट

सचिन खेडेकर, अभय वर्मा, स्पर्श श्रीवास्तव, एलेक्स नील आणि आनंद तिवारी हे कलाकार 'ऐ वतन मेरे वतन' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. इमरान हाशमी या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून काम करणार आहे. करण जौहर, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांची कथा 'ऐ वतन मेरे वतन' या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

सारा अली खानचे चित्रपट

सारा अली खानच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. जरा हटके जरा बचके, केदारनाथ, सिम्बा,लव्ह आज कल-2, अतरंगी रे या चित्रपटांमधून सारा प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता साराच्या 'ऐ वतन मेरे वतन' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT