Sara Ali Khan Opens Up Divorce of parents saif and amrutra  
मनोरंजन

सारा म्हणते ''बरं झालं आई-बाबांचा घटस्फोट झाला''

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूडमध्ये सतत काही ना काहीतरी घडत असतं. सेलिब्रिटी आणि त्यांची लव्हलाइफ नेहमीच चर्चेचा विषय असतो. सारा अली खानने काही वेळ्तच बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. केदारनाथ आणि सिंबा हे दोन चित्रपट तिने केले आणि दोन्ही चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरले. साराचे आई वडील दोघेही सेलिब्रिटी आहेत आणि तरीही साराने स्वत:ला सिद्ध केलं आहे. नुकतचं तिेने आई-वडिलांच्या घटस्फोटाविषयी एक धक्कादायक विधान केलं आहे. 

सारा वैयक्तिक आयुष्यातही जॉली व्यक्ती आहे. रिलेशनशिप, प्रेम आणि इतरही विषयांवर ती नेहमीच खुलेपणाने बोलते. तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आहे आणि त्याविषयीही सारा मोकळेपणाने बोलली आहे. एका मुलाखतीमध्ये याविषयी बोलत असताना ती म्हणाली ''बरं झालं माझ्या आई वडिलांनी घटस्फोट घेतला''. याविषयी बोलताना सारा पुढे म्हणाली, ''आई वडिलांनी घेतलेल्या या निर्णयासाठी मी देवाचे आभारच मानते. गुदमरत राहण्यापेक्षा बरं झालं त्यांनी हा निर्णय घेतला.

मुलांसाठी पालक मन मारुनही एकत्र राहतात. पण, तुम्ही स्वत: च आनंदी नाही तर, मुलांना आनंदी कसं ठेवणार ? मन मारुन, गुदमरत राहणे कोणालाच पसंत नाही आणि त्याचा फायदाही कोणाला होत नाही. माझ्या आई वडिलांना घेतलेला निर्णय हा योग्य आहे. एका दु:खी घरापेक्षा माझ्याकडे दोन आनंदी घरं आहेत.'' पुढे सारा म्हणाली, ''वडिलांवर माझं खूप प्रेम आहे. पण, आई माझी प्रेरणा आहे. आम्ही एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी आहोत. आई माझं सर्वस्व आहे.''

अमृता आणि सैफने 1991 मध्ये लग्न केलं. अमृता सिंग सैफपेक्षा वयाने मोठी आहे. पण, हा संसार फार काळ टिकला नाही आणि 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 2012 मध्ये करीना कपूर आणि सैफ विवाहबंधनात अडकले. करीना आणि सैफमध्ये 10 वर्षांचं अंतर आहे. 

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय आणि साऊथचा सुपरस्टार धनुष या दोन कलाकारांसोबत सारा दिसणार आहे. 'अतरंगी रे' असं त्या सिनेमाचं नाव असून त्याचा एक फोटो साराने शेअर केला.  दिग्दर्शक इम्तियाज अलीचा 'लव्ह आज कल' 14 फेब्रुवारीला म्हणजेच 'व्हॅलेंटाईन डे'ला आपल्या भेटीला येतोय. सारा अली खान आणि कार्तिक आर्यन या चित्रपटात मुख्य भूमिकेत असतील. 2009मध्ये आलेला सैफ अली खान आणि दीपिका पदुकोनचा पहिला 'लव्ह आज कल' आजही प्रेक्षकांचा आवडता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

Shilpa Shetty Latest News : शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढल्या! , आता मुंबईतील घरावरही 'आयकर' विभागाची छापेमारी

SCROLL FOR NEXT