sara ali khan shares her fat photo on instagram  
मनोरंजन

सारा अली खानचा हा फोटो बघून तुम्हालाही बसेल धक्का!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लाडकी कन्या सारा अली खान सध्या तिचा बॉयफ्रेंड कार्तिक आर्यन याच्यामुळे चर्चेत आहे. त्यांची लव्हस्टोरी हळूहळू फुलायला लागलीय. पण सध्या सारा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलीय. तिने शेअर केलेला एक फोटो व्हायरल होतोय. हा फोटो बघून तुम्हालाही धक्का बसेल.

साराने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर तिचा पूर्वीचा फोटो शेअर केलाय. ज्यात ती आणि तिची आई अमृता सिंग दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या फोटोत सारा ओळखूच येत नाहीये. प्रचंड जाड अशी सारा तुम्हाला या फोटोत दिसेल. दोघी मायलेकींनी काळ्या रंगाचा ड्रेस घातलाय. 'Throw back to when I couldn't be thrown' असं कॅप्शन तिने या फोटोला दिलंय. आताची सारा आणि त्या वेळची सारा यात प्रचंड फरक आहे. 

साराने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिचं वजन 96 किलो होतं. अभिनेत्री बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी साराने तिचं वजन कमी केलं. वकिली ते अभिनेत्री हा साराचा प्रवास अत्यंत संघर्षमय होता.

सारा सांगते, 'सुरवातीला मी माझ्या खाणं, खाण्याच्या वेळा यावर नियंत्रण करायला सुरुवात केली. मी जंक फूड खाणं पूर्णपणे बंद केलं. नियमित व्यायाम, सायकलिंग, बॉक्सिंग याच्या सहाय्याने मी माझं वजन कमी करायला सुरुवात केली आणि या सर्वात आणखी एक गोष्ट मी केली होती ती म्हणजे मी माझ्या आईला पूर्ण एक वर्ष भेटले नव्हते किंवा तिच्याशी व्हिडिओ कॉल केला नव्हता. जेव्हा मी भारतात परतले तेव्हा तिनं मला माझ्या बॅगवरुन ओळखलं. एवढा माझ्या लुकमध्ये बदल झाला होता. पण ती माझ्यासाठी खूप आनंदी होती. आजही मी रोज कमीत कमी दीड तास व्यायाम करते.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT