Sara ali khan made shayari on social media  
मनोरंजन

सारा झाली शायर, रेखाजींशी स्वत: ची तुलना करत म्हणाली...

वृत्तसंस्था

मुंबई : सारा अली खानने काही वेळ्तच बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. केदारनाथ आणि सिंबा हे दोन चित्रपट तिने केले आणि दोन्ही चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरले. साराचे आई वडील दोघेही सेलिब्रिटी आहेत आणि तरीही साराने स्वत:ला सिद्ध केलं आहे. सारा वैयक्तिक आयुष्यातही जॉली व्यक्ती आहे. मुलाखतींमधून तिची फन साइड नेहमीच दिसून येते. सारा आता अभिनयासोबतच शायरीदेखील करायला लागली आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने शायरी केली आहे, बघा सारा म्हणतेय तरी काय!

सारा सोशल मीडियावर खूप अॅक्टीव असते. साराने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केला. ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटो आणि त्याचसोबत साराने 1981 मध्ये आलेला सिनेमा 'उमराव जान' यामधील गाण्याचा उल्लेख केला आहे. रेखा यांच्या गाण्यातील ओळी वापरत साराने स्वत:वरच एक मजेशीर शायरी केली आहे. सारा कॅप्शनमध्ये म्हणते,'इन आँखों की मस्ती, रेखा जी से है सारा बहुत सस्ती, लकली वह अपने आप पर ही हस्ती, वह यह सब कहती है और फिर फस्ती'

या मजेशीर शायरीने मात्र नेटकऱ्याचं मन जिकलं आहे. सारा य़ा फोटोमध्ये सुंदर दिसत आहे आणि 90 च्या दशकाचा फिल देत आहे. सारा सध्या डेविद धवन यांच्या 'कुली नंबर 1' चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. सैफ आणि दीपिका यांच्या 'लव आज कल' चित्रपटाचा सिक्वेल 'लव आजकल 2' मध्येही ती झळकणार आहे. त्यामध्ये कार्तिक आर्यनसोबत स्क्रिन शेअर करताना ती दिसणार आहे. हा चित्रपट व्हॅलेंटाइन डेला पुढच्या वर्षी 14 फेब्रुवारी 2020 ला रिलिज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : कोयना धरणात 98.35 टीएमसी पाणीसाठा; 2 ते 3 दिवसांत धरण 100 टीएमसी भरण्याची शक्यता, धरणाचे दरवाजे 1 फुटावर...

Pune Kondhwa Ganja Raid : कोंढव्यात गांजा विक्रीवर पोलिसांचा मोठा छापा; २ विक्रेत्यांसह ४३ ग्राहक ताब्यात, २.५ किलो गांजा जप्त

मी पाहिलं माझ्या डोळ्यांच्या थ्रू...! मुंबई पोलिसांची Gen Z स्टाईल; नाना पाटेकर यांच्या 'क्रांतिवीर' गाण्याच्या ओळीतून केलं आवाहन

Latest Marathi News Live Update : वाकडमध्ये स्कूल व्हॅनला भीषण आग

Eknath Shinde: शिंदे गटाला धक्का! खोपोलीतील बड्या नेत्याचे पद रद्द, पडताळणीत जात प्रमाणपत्र अवैध

SCROLL FOR NEXT