Sara Ali Khan shares throwback video see her weight loss transformation  
मनोरंजन

साराने शेअर केला थ्रोबॅक व्हिडीओ, तिला ओळखणेही कठीण

वृत्तसंस्था

मुंबई : सारा अली खानने काही वेळ्तच बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. केदारनाथ आणि सिंबा हे दोन चित्रपट तिने केले आणि दोन्ही चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरले. साराचे आई वडील दोघेही सेलिब्रिटी आहेत आणि तरीही साराने स्वत:ला सिद्ध केलं आहे. सारा वैयक्तिक आयुष्यातही जॉली व्यक्ती आहे. मुलाखतींमधून तिची फन साइड नेहमीच दिसून येते. सारा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्या व्हिडीओमधील साराला तुम्ही ओळखू शकणार नाही !

सारा बिनधास्त आहे आणि त्यामुळेच ती खुलेपणाने बोलते. बॉलिवूडमध्ये येण्याआधी सारा जाड होती. आता तीने स्वत: ला फिट केले आहे. तिचे जीम लुक नेहमीच फेमस होतात. सारा कोणत्याही आऊटफिटमध्ये छान दिसते. काहीवेळा क्युट तर कधी हॉट आणि बोल्ड लुक पाहायला मिळतो. सारा आधी हेल्दी होती आणि हे तिनेही मान्य केलं आहे. इन्स्टाग्रामवर तिने स्वत:चे जुने फोटो शेअर केले आहेत. याआधीचा तिचा लुक पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही. पाहा सारानेच शेअर केलेला एक मजेशीर व्हिडीओ. यामध्ये सारा विमानात बसली आहे. तिच्या दोन मैत्रिणींसह ती दिसते आहे. या व्हिडीओमध्ये सारा वेगळीच दिसते आहे आणि अतिशय मजेशीर अंदाज समोर आला आहे. 

सारा या व्हिडीओमध्ये मस्ती करताना दिसते आहे. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला 'सर जो तेरा टकराए' हे गाणं वाजत आहे. आता सारा फिट दिसत असली तरी याआधी जाडेपणामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. त्यावेळी तिचं वजन 96 किलो एवढं होतं. आताचा तिचा हा व्हिडीओ पाहून तिला ओळखणेही अनेकांना कठीण झाले आहे. 

अस असलं तरी मात्र साराचा हा फन व्हिडीओ चाहत्यांना आवडला आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे.  सारा सध्या डेविद धवन यांच्या 'कुली नंबर 1' चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. सैफ आणि दीपिका यांच्या 'लव आज कल' चित्रपटाचा सिक्वेल 'लव आजकल 2' मध्येही ती झळकणार आहे. त्यामध्ये कार्तिक आर्यनसोबत स्क्रिन शेअर करताना ती दिसणार आहे. हा चित्रपट व्हॅलेंटाइन डे म्हणजेच  14 फेब्रुवारीला रिलिज होणार आहे. तर, 'कुली नंबर 1' 1 मे 2020 ला रिलिज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT