Sara Ali Khan Esakal
मनोरंजन

Sara Ali Khan :'मुंबई मेरी जान..', हेमा मालिनीनंतर सैफच्या लाडकीलाही पडली मेट्रोची भुरळ! लक्झरी कार सोडून साराची मेट्रोवारी...

Vaishali Patil

बॉलिवुड अभिनेत्री सारा अली खान ही आपल्या सौंदर्य आणि अभिनयामुळं लोकप्रिय आहे. त्याचबरोबत ती सोशल मिडियावरही खुप सक्रिय असते. ती तिच्या मजेशीर व्हिडिओमुळेही चर्चेत असते. ती नेहमीच तिच्या टिमसोबत आणि कोस्टार सोबत फनी व्हिडिओ शेअर करते.

अशातच तिचा एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यात सारा मेट्रोमध्ये प्रवास करतांना दिसत आहे. आलिशान लक्झरी गाड्या असतांना सारा मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत आहे.

खर तर सारानेच याबद्दल तिच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. साराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती सामान्य प्रवाशांप्रमाणे मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत आहे.

Sara Ali Khan

तर दुसरीकडे आता व्हिडिओचा स्क्रीनशॉट इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये साराने पांढऱ्या आणि गुलाबी रंगाचा प्रिंटेड ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. मेट्रोमध्ये प्रवास करताना सारा खूप आनंदी दिसत आहे. यासोबतच तिने या व्हिडिओला 'मुंबई मेरी जान' असं कॅप्शन दिले आहे.

तिचा हा फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. सर्वच नेटकरी या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सारा अली खान सध्या अनुराग बासूच्या 'मेट्रो इन दिनन' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये अनुराग बसू आणि आदित्य यांचा उल्लेखही केला आहे. सारा अली खानने लिहिले की, 'तुम्हा दोघांच्या आधी मी मेट्रोमध्ये प्रवास करेन, असं मला वाटलं नव्हतं.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT