Sari marathi movie Trailer ritika shrotri ajinkya raut cast release date sakal
मनोरंजन

Sari Trailer: असं घडतं तेव्हा.. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाने पाहावा असा 'सरी'चा दमदार ट्रेलर..

प्रेमाच्या 'सरी'चा ट्रेलर प्रदर्शित..

नीलेश अडसूळ

आश्चर्य आणि चमत्कार या अशा दोन गोष्टी ज्याचा अनुभव आयुष्यात प्रत्येकाला कधीनाकधी तरी येतोच. म्हणूनच तर म्हणतात ना, 'लाईफ इज फुल ऑफ सरप्राईजेस अँड मिरॅकल्स'. याच सरप्राईजेस अँड मिरॅकल्सने भरलेल्या 'सरी' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

अशोका के. एस. दिग्दर्शित या चित्रपटात अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री, पृथ्वी अंबर आणि मृणाल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कॅनरस प्रॉडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित हा चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

(Sari marathi movie Trailer ritika shrotri ajinkya raut cast release date)

आतापर्यंत झळकलेल्या टिझर, गाण्यांवरून यात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार याची कल्पना आतापर्यंत आली असेलच. ट्रेलरमध्ये सुरुवातीलाच दिया (रितिका) ‘मला माझं पूर्ण जीवन तुझ्यासोबत घालवायचंय... आय लव्ह यू...’ म्हणताना दिसत आहे. आता हे वाक्य नक्की कोणासाठी आहे, रोहित (अजिंक्य) की आदी (पृथ्वी) साठी? रोहितवर मनापासून प्रेम करणाऱ्या दियाच्या आयुष्यात आदीही दिसत आहे. मात्र या तिघांच्याही प्रेमात अनेक चढउतार दिसत आहेत.

आता तिघांच्या आयुष्यात आलेले हे सरप्राइजेस आणि मिरॅकल्स नेमके काय आहेत आणि अखेर दिया कोणाची निवड करणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना 'सरी' पाहिल्यावर मिळणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शक अशोका के. एस. आणि अभिनेता पृथ्वी अंबर मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती, चित्रपटाच्या प्रदर्शनाची.

दिग्दर्शक अशोक के. एस. म्हणतात, "खूप वर्षांपासून मराठी चित्रपट करण्याची इच्छा होती. 'सरी'च्या निमित्ताने ही इच्छा पूर्ण झाली. आजवर मराठी चित्रपटांविषयी, कलाकारांबद्दल खूप चांगले ऐकले होते. यावेळी प्रत्यक्ष काम करताना त्याचा अनुभव आला. मुळात मराठी कलाकार हे खूप प्रतिभावान आहेत.

सगळ्यांनीच एकमेकांना खूप सहकार्य केले. चित्रपटाबद्दल सांगायचे तर ही एक प्रेमकहाणी आहे. अशी प्रेमकहाणी ज्यात प्रत्येक वळणावर सरप्राईज आणि चमत्कारीत घटना घडणार आहेत. तरुण-तरुणी भावेल असा हा चित्रपट असला तरी संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा 'सरी' आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News :...तर पुण्यात संध्याकाळी ७ पर्यंतच पेट्रोल पंप सुरु ठेऊ; पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा थेट इशारा, कारण काय?

Kolhapur Politics : संजय पाटील यड्रावकर आणि राजू शेट्टींचे पीए स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी, "तुमचा काय संबंध"; नगपरिषदेतच हाय व्होल्टेज ड्रामा

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरमध्ये काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

Nagpur Land Survey : नवीन नागपूरसाठी जमिनीच्या संयुक्त मोजणीला सुरुवात; शेतकऱ्यांचे सहकार्य; विविध यंत्रणांचा सहभाग!

Pune Traffic : पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा; चारही महामार्ग जोडणारा ४५ किमीचा 'ट्विन टनेल' भूमिगत रस्ता प्रस्तावित

SCROLL FOR NEXT