Ram Gopal Varma And Amitabh Bachchan  esakal
मनोरंजन

Sarkar 4 : 'सरकार ४' येतोय? राम गोपाल वर्मा अन् बिग बी यांच्या फोटोनं चर्चेला उधाण!

राम गोपाल वर्मा आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचा (Ram Gopal Varma And Big B Amitabh Bachchan) फोटो व्हायरल झाला आणि एका वेगळ्याच चर्चेला उधाण आल्याचे दिसून आले.

युगंधर ताजणे

Sarkar 4 Ram Gopal Varma : ज्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा सरकार नावाचा चित्रपट पाहिला असेल त्यांना काही वेगळं सांगण्याची गरज नाही. या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनावर मोठं गारुड केल्याचं दिसून आले आहे. अशातच आता सरकार ४ ची चर्चा सुरु झाली आहे.त्याला कारणही तसचं आहे.

राम गोपाल वर्मा हे नेहमीच त्यांच्या हटके स्टाईल आणि प्रतिक्रियांमुळे चर्चेत राहिले आहे. त्यांच्या चित्रपटांनी चाहत्यांना, प्रेक्षकांना मोठा आनंद दिला असला तरी वर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. सध्या राम गोपाल वर्मा आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचा एक फोटो व्हायरल होतो आहे.

त्या फोटोंनी नेटकऱ्यांनी, चाहत्यांनी वेगवेगळे अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली आहे. आता राम गोपाल वर्मा हे पुन्हा एकदा बिग बी यांच्या सोबत सरकारच्या तयारीत आहेत. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. यापूर्वी सरकार या चित्रपटाचे तीन भाग प्रदर्शित झाले असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

सोशल मीडियावर राम गोपाल वर्मा आणि बिग बी यांच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट आहे. यानंतर काहीच वेळानं सरकार ४ येतोय अशा आशयाच्या प्रतिक्रिया समोर आल्याचे दिसून आले आहे. मात्र या सगळयात राम गोपाल वर्मा यांच्याकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेलं नाही.

एक्स वर याबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. त्यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. नेटकऱ्यांनी बिग बी आणि राम गोपाल वर्मा यांच्या एकत्रित फोटोवरुन वेगळाच अंदाज बांधला आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,राम गोपाल वर्मा यांच्या दुसऱ्या इंनिंगला सुरुवात होणार आहे. ते पुन्हा वेगळ्या अंदाजात दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT