Shruti Marathe
Shruti Marathe esakal
मनोरंजन

‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात 'श्रुती मराठे' दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

धनश्री ओतारी

‘मराठीतील महासिनेमा’ असे घोषवाक्य मिरवणारा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा प्रवीण तरडे दिग्दर्शित, अभिनित भव्य ऐतिहासिकपट २७ मेला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, चित्रपटातील अनेक स्टारकास्टचे फर्स्ट लुक रिलीज होत आहेत. अशातच अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठेदेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिची पहिली झलक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

श्रुती मराठेने स्वतः आपल्या इस्टाग्राम अकाऊंटवर ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचे नवं पोस्टर रिलीज केले. 'राज्याच्या दोन्ही युवराजांना प्रेमानं वाढवलेली स्वराज्य माऊली!' अशी पोस्टला कॅप्शन दिली आहे. आणि महाराणी सोयराबाई यांची भुमिका स्विकारणार असल्याची माहिती श्रुतीने दिली आहे.

इ टाईम्लला दिलेल्या एका खास मुलाखतीत श्रुतीने या चित्रपटातील तिच्या पात्राबद्दल आपले मत व्यक्त केले. श्रुती म्हणाली, "सोयराबाई' या पात्राबाबत अनेक आहेत आणि लोक म्हणतील की ती खूप नकारात्मक आणि ग्रे शेड पात्र होती. जर आपण तिच्या दृष्टीकोनातून पाहिले तर मला वाटते की तिने जे काही केले ते योग्य होते आणि तिने आपल्या मुलासाठी केले."

‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका अशी दोन्ही आव्हानं पेलली आहेत. सरसेनापती हंबीरराव मोहिते (Hambirrao Mohite) हे प्राचीन राजघराण्यातील थोर व्यक्तिमत्त्‍व आहे. छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील ते एकमेव प्रधान होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT