मृणाल दुसानिच्या लेकीची पहिली झलक, क्यूट VIDEO व्हायरल

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल दुसानीस हिच्या नन्ह्या परीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Mrunal Dusanis
Mrunal Dusanis esakal
Updated on

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल दुसानीस हिच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे. नुकतंच तिने आपल्या चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सध्या तिच्या बाळाचा क्यूट व्हिडीओ मराठी सिनेसृष्टीत चर्चेत आला आहे. मृणालने पहिल्यांदाच आपल्या परीचा चेहरा चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

Mrunal Dusanis
'राज ठाकरे हे ट्रेण्ड चेंजर..' जाणून घ्या काय म्हणाले जॅकी श्रॉफ...

मृणालने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मृणालने नुरवीची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे. तिचा व्हिडिओ पाहून सेलेब्ससह अनेक चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

मृणालने 2016 मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर नीरज मोरेसोबत अरेंज मॅरेज केलं होतं. कांदेपोहेच्या कार्यक्रमात मृणाल आणि नीरज पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. नीरज अमेरिकेत राहात असून मृणाल देखील सध्या तिथेच असते. मृणालने 24 मार्चला मुलीला जन्म दिला.

Mrunal Dusanis
लग्नाच्या प्रश्नावर कियाराने दिलेल उत्तर पाहून सिद्धार्थ बसला धक्का

माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून अभिनेत्री मृणाल दुसानिस घराघरात पोहोचली. त्यानंतर तू तिथे मी, अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेत तिने काम केलं. ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेत काम करत असतानाच, मृणालने काही कालावधीसाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती ‘हे मन बावरे’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकली होती. तूर्तास मृणाल मातृत्वाचा आनंद घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com