Sarsenapati Hambirrao fight with rain Eventually the battle successful 
मनोरंजन

‘सरसेनापती हंबीररावांचे' पावसाशी दोन हात; अखेर लढाई झाली यशस्वी

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - कोणत्याही ऐतिहासिक चित्रपटाचे शूटिंग सलगपणे करणे निर्मात्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरत असते, कारण मोठ्या ऐतिहासिक चित्रपटांसाठी उभारले जाणारे भव्य सेट, त्या काळाची वातावरण निर्मिती याचा मोठा खर्च असतो. अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे. उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे केवळ तीन दिवसाचे शूटिंग बाकी होते आणि त्याची संपूर्ण तयारी झाली असताना लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे शूटिंग थांबवावे लागले.

बाकी राहिलेल्या शूटिंगला सात महिन्यांनातर परवानगी मिळाली, भोर येथे नव्याने भव्य सेट उभारण्यात आला, सर्व तयारी झाली, शूटिंगला सुरुवात झाली आणि पावसाने जोरदार हजेरी लावत परत एकदा व्यत्यय आणला. मात्र ‘सरसेनापती हंबीरराव’ च्या लढाऊ मावळ्यांनी आलेल्या संकटाशी दोन हात करत नियोजित शूटिंग मोठ्या जिद्दीने पूर्ण केले. पावसाबरोबर यशस्वी मुकाबला करत शूटिंग पूर्ण करताना दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे म्हणाले, 6 जून 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला त्यावेळी पहाटे पाऊस पडला होता. आज शिवराज्याभिषेक सोहळा शूटिंग करतानाही पाऊस पडत आहे, या पावसामुळे शूटिंगमध्ये व्यत्यय निर्माण झाला तरी आम्ही या गोष्टीकडे सकारात्मक बाब म्हणून बघतो.

चित्रपटाचे निर्माते संदीप मोहिते-पाटील म्हणाले, लॉकडाऊन मुळे तीन दिवसांचे शूटिंग  बाकी होते. परवानगी मिळाल्यानंतर शूटिंग सुरू केले. मात्र ऐन शूटिंगच्या वेळी वादळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या भव्य सेटचे मोठे नुकसान झाले असले तरी चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे, डिओपी महेश लिमये, अभिनेते उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, सुनील अभ्यंकर, देवेंद्र गायकवाड, कार्यकारी निर्माते विशाल चांदणे यांच्यासह संपूर्ण टीम या संकटाशी यशस्वीपणे झुंजली आणि नियोजित शूटिंग वेळेत पूर्ण केले ही बाब आमचा उत्साह वाढवणारी आहे. आता पोस्ट प्रॉडक्शनचे काम पूर्ण करून ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट प्रदर्शनासाठी आम्ही तयार ठेवणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : हिंसाचारात होरपळून निघालेल्या मणिपूरला पंतप्रधान मोदी आज देणार भेट

Mumbai : अभिनेत्रीनं धावत्या लोकलमधून मारली उडी, डोक्याला अन् पाठीला गंभीर दुखापत; रुग्णालयात उपचार सुरू

ENG vs SA 2nd T20 : इंग्लंडचा T20I मधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला; नोंदवले एकापेक्षा सरस रेकॉर्ड

Nagpur News: रेल्वेच्या छतावर चढताच विजेचा धक्का; युवकाची प्रकृती चिंताजनक, रेल्वे स्थानकावरील घटना

मोठी बातमी! पगारावरील शिक्षकांनाही द्यावी लागणार ‘टीईटी’; सुप्रिम कोर्टाच्या निकालावर राज्य सरकार गप्पच; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेणार २३ नोव्हेंबरला ‘टीईटी’

SCROLL FOR NEXT