gashmir mahajani role chhatrapati shivaji maharaj  file image
मनोरंजन

Video: 'सरसेनापती हंबीरराव' मधील महाराजांचे सिंहासनाधिश्वर दर्शन

शिवराज्याभिषेकाच्या मुहूर्तावर ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

प्रियांका कुलकर्णी

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे(pravin tarde) यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ (sarsenapati hambirrao) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची पटकथा, कथा संवाद आणि दिग्दर्शन हे प्रविण विठ्ठल तरडे यांनी केले आहे. अनेक प्रसिद्ध कलाकार या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.(sarsenapati hambirrao movie teaser release gashmir mahajani role chhatrapati shivaji maharaj pravin tarde)

शिवराज्याभिषेकाच्या मुहूर्तावर ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी साकारणार आहे. गश्मीरने या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करून त्याला कॅप्शन दिले, '"सरसेनापती हंबीरराव" हा केवळ एक चित्रपट नाही, तर आपल्या दोन्ही छत्रपतींशी निगडीत एक पवित्र भावना आहे.. असे कितीही लॅाकडाऊन आले तरी ही भावना व्यक्त होणार चित्रपटगृहातच.. लवकरच.. पण त्या आधी आजच्या या पवित्र पावन दिवशी तुमच्या आमच्या महाराजांचे हे सिंहासनाधिश्वर दर्शन!'.मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठेने देखील या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे श्रुतीसुद्ध या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा सुरू आहे.

‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाची प्रविण तरडे यांनी घोषणा केली होती. तेव्हापासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. याआधी प्रविण तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला फटका

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT