Satish Alekar esakal
मनोरंजन

Satish Alekar: सतीश आळेकर यांना 'विष्णुदास भावे पुरस्कार' जाहीर

नाट्यक्षेत्रात मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा विष्णुदास भावे पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Satish Alekar: नाट्यक्षेत्रात मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा विष्णुदास भावे पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. यावर्षीचा पुरस्कार हा ज्येष्ठ नाट्यकर्मी सतीश आळेकर यांना प्रदान केला जाणार आहे. 5 नोव्हेंबर रोजी मराठी - हिंदी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आळेकर यांनी रंगभूमीसाठी महत्वाचे योगदान दिले आहे. अभिनेता, नाटककार, दिग्दर्शक, निर्माता अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून आळेकर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आज एका पत्रकार परिषदेतून विष्णुदास भावे पुरस्काराची घोषणा करण्यात आली. त्यात त्यांचे नाव जाहीर करण्यात आले. सतीळ आळेकर यांच्या नावाची घोषणा होताच मराठी नाट्यरसिकांनी आनंद व्यक्त केला आहे. सतीश आळेकर यांनी महानिर्वाण, बेगम बर्वे सारख्या नाटकांतून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

घाशीराम कोतवाल’या नाटकासाठी डॉ. जब्बार पटेल यांना दिग्दर्शनात साहाय्य केलेल्या आळेकर यांनी थिएटर अॅकॅडमी या नाट्यसंस्थेच्या स्थापनेत महत्वाची भूमिका घेतली. याच संस्थेच्या माध्यमातून रंगमंचावर आलेल्या ‘मिकीमाऊस आणि मेमसाब’, ‘महापूर’, ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’या नाटकांनी आळेकर यांना नाटककार म्हणून वेगळी ओळख दिली. आळेकर यांना यापूर्वी अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला असून आळेकर यांना पद्मश्री किताबानं देखील सन्मानित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT