satish kaushik 
मनोरंजन

सतीश कौशिक रुग्णालयात दाखल; कोरोनावरील उपचार सुरू

स्वाती वेमूल

अभिनेते सतीश कौशिक यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलं आहे. ते दोन दिवस घरीच क्वारंटाइनमध्ये राहत होते. त्यानंतर आता त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. "सतीशजी कोरोना प्रतिबंधक लस घेणारच होते. पण त्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ते घरीच दोन दिवस क्वारंटाइनमध्ये राहत होते. पण आता योग्य उपचार मिळावा म्हणून त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे", अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांनी त्यांनी आभार मानले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. 

बुधवारी संध्याकाळी सतीश कौशिक यांनी ट्विट करत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. "सर्वांनी कृपया याकडे लक्ष द्या. माझा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया कोरोना चाचणी करून घ्यावी. मी घरीच क्वारंटाइनमध्ये आहे", असं ट्विट त्यांनी केलं होतं. सतीश कौशिक यांनी ट्विट करताच नेटकऱ्यांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी ट्विट करत काळजी घेण्याचं आवाहन केलं. 

राज्यात गेल्या तीन दिवसांपासून २५ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत असताना रविवारी रुग्णवाढीने ३० हजारांचा टप्पा ओलांडला. राज्यात रविवारी ३०,५३५ नव्या बाधिकांची नोंद झाली. आतापर्यंतची ही उच्चांकी दैनंदिन रुग्णवाढ आहे. राज्यात आठवड्याभरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने झाला असून बाधितांचे प्रमाण २० टक्क्यांवर पोहोचले आहे. तर रुग्णसंख्या ९० हजारांवरून दीड लाखांवर केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये याच वेगाने रुग्णवाढ झाल्याचे आढळले होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या उपोषणाला १५ गावांचा पाठिंबा; कन्नडमध्ये वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर रास्ता रोको

इन्स्टावर ओळख, लग्नाच्या आमिषाने ठेवले संबंध; १७ वर्षीय मुलीनं बाळाला जन्म देताच २० वर्षीय आरोपी फरार, नवी मुंबईतील घटना

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT