Satish Kaushik Networth Esakal
मनोरंजन

Satish Kaushik Net Worth: पत्नी आणि ११ वर्षाची मुलगी..कमवणारं कुणीच नाही..किती संपत्ती मागे ठेवून गेलेयत सतिश कौशिक

अभिनेते-दिग्दर्शक सतिश कौशिक यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी हृद्यविकाराच्या तीव्र झटक्यानं ९ मार्च,२०२३ रोजी निधन झालं आहे.

प्रणाली मोरे

Satish Kaushik Net Worth: बॉलीवूड अभिनेता-दिग्दर्शक सतिश कौशिक आता आपल्यामध्ये नाहीत. ९ मार्च,२०२३ रोजी पहाटे त्यांना हृद्यविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.

अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर याविषयीची माहिती देत ही दुःखद बातमी शेअर केली. पण या बातमीनंतर संपूर्ण बॉलीवूडवर शोककळा पसरली. भारतीय सिनेमाला नेहमीच सतिश कौशिक याचं नसणं जाणवत राहिल. सतिश कौशिक यांनी आपल्या सबंध करिअरमध्ये लोकांना खळखळून हसवलं...ते भूमिका जगले असं म्हटलं तर नक्कीच अतिश्योक्ती ठरणार नाही.

' मिस्टर इंडिया' त त्यांनी साकारलेला कॅलेंडर आजही आपल्या मनात जिवंत आहे आणि इथून पुढेही राहील. 'मिस्टर इंडिया' सोबतच 'जाने भी दो यारों','दीवाना मस्ताना' आणि 'उडता पंजाब' सारख्या सिनेमात सतिश कौशिक यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

आज त्यांच्या निधनानंतर पत्नी आणि मुलगी असा परिवार मागे आहे. तेव्हा जाणून घेऊया सतिश कौशिक यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबासाठी ते किती संपत्ती मागे ठेवून गेलेत..किती आहे त्यांची नेटवर्थ..

इंडिया डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार सतिश कौशिक यांच्याजवळ २०२३ पर्यंत पाहिलं गेलं तर जवळपास ५० करोडची संपत्ती आहे. जी त्यांनी अथक परिश्रम करुन कमावली आहे.

त्यांनी आपल्या अभिनयाच्या आणि दिग्दर्शनाच्या माध्यामातूनच ही संपत्ती कमावली आहे. याव्यतिरिक्त त्यांच्या काही व्यावसायिक गुंतवणुकीही आहेत. सतिश कौशिक यांनी बॉलीवूडमध्ये जवळपास तीन दशकं काम केलं आहे.

हेही वाचा: डेट फंडातही आकर्षक परताव्याची संधी..पण गुंतवणूक करण्यापूर्वी हे वाचा...

सतिश कौशिक यांनी १९८५ साली शशी कौशिक यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांचा मुलगा शानू कौशिक याचं १९९६ साली निधन झालं,जेव्हा तो केवळ दोन वर्षाचा होता.

त्यानंतर २०१२ मध्ये सरोगसीच्या माध्यमातून त्यांची मुलगी वंशिकाचा जन्म झाला. वयाच्या ५६ व्या वर्षी ते दुसऱ्यांदा पिता बनले. आता त्यांच्या पश्चात मागे त्यांची पत्नी आणि ११ वर्षाची मुलगी वंशिका असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात कारमध्ये प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे, नको त्या अवस्थेत सापडले; तरुणी लहान असल्यानं पोलिसांनी ताकीद देत सोडलं, VIDEO VIRAL

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या रेस्टॉरंट अँड बार मध्ये दरोडा

Aadhar Card Updates : आधारकार्ड मध्ये होणार मोठा बदल! नवीन आधार असणार अधिक सुरक्षित! जाणून घ्या काय होणार बदल

विदर्भातही बिबट्याची दहशत! नागपुरातील भांडेवाडी परिसरात वावर, वनविभागाचं पथक दाखल

SCROLL FOR NEXT