Satyaprem Ki Katha starring karthik aryan kiara advani directed by samir vidwans Satyaprem Ki Katha Box office Collection day 3 SAKAL
मनोरंजन

Satyaprem Ki Katha BO: प्रेक्षकांना आवडला आणि शनिवार सत्तुला पावला! कमाईत झाली इतक्या कोटींची भरघोस वाढ..

Vaishali Patil

Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 3: बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा बहूचर्चित चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' हा ' 29 जून रोजीच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

ईदच्या मुहूर्तांवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईच्या आकडेवारीवर नजर टाकली असता हा चित्रपट काही खास कमाल करु शकणार नाही असं वाटलं होत मात्र दोन दिवसात या चित्रपटाने चांगली कमाई केली.

त्यातच आता तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे देखील समोर आले आहेत. त्या आकडेवारीवरुन आता हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात आकर्षित करण्यास यशस्वी झाल्याचं दिसत आहे.


समीर विद्वांस दिग्दर्शित, या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षक यांच्याकडून समिश्र प्रतिसाद मिळाला आहे. शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने खुप कमाई केली मात्र तिसऱ्या दिवशी चित्रपटाचे आकडे हे चित्रपट हिट ठरवण्यासाठी सकारात्मक आहे.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असून प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळत आहे. कार्तिक-कियारा यांच्या चित्रपटाने रिलीजच्या दोन दिवसांतच चांगली कमाई केली आहे.

मिळालेल्या आकडेवारी नुसार, सत्यप्रेम की कथा च्या रिलीजच्या तिसऱ्या दिवशी 40-48% ची वाढ नोंदवली आहे. ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपटाने सुमारे 10 कोटींच्यावर कमाई केली आहे. पहिल्या दिवशी 9.25 कोटी अन् दुसऱ्या दिवशी 7 कोटींची कमाई चित्रपटाने केली.

यासह चित्रपटाची एकूण कमाई 26.25 ते 26.65 कोटींच्या दरम्यान पोहोचली आहे. आता जगभरातील कमाई पाहता हा चित्रपट विकेंडला 40-41 कोटींच्या आसपास कमाई करेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT