satyashodhak marathi movie premiere in new zealand wellington february 2024  SAKAL
मनोरंजन

Satyashodhak: अभिमानाचा क्षण! न्यूझीलंडमध्ये हॉलिवूड स्टार्सच्या उपस्थितीत 'सत्यशोधक'चा प्रिमियर

'सत्यशोधक' निमित्ताने मराठी चित्रपट विश्वात पहिल्यांदाच ही घटना घडणार आहे

Devendra Jadhav

Satyashodhak Movie News: महात्मा फुलेंच्या जीवनकार्यावर आधारित 'सत्यशोधक' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. 'सत्यशोधक' सध्या संपूर्ण महाराष्ट्रात हाऊसफुल्ल गर्दीत सुरु आहे. सिनेमाचं तिसऱ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण झालंय.

अशातच 'सत्यशोधक' सिनेमाबद्दल मोठी बातमी समोर आलीय. ज्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना नक्कीच आनंद होईल.

हॉलिवूडमध्ये होणार सत्यशोधकचा प्रिमियर

सत्यशोधक सिनेमाच्या टीमने त्यांच्या सोशल मीडियावर एक खास बातमी शेअर केलीय. फेब्रुवारी २०२४ मध्ये न्यूझीलंडमध्ये 'सत्यशोधक'चा प्रिमियर होणार आहे. न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टन येथे हा प्रिमियर सोहळा आयोजित करण्यात आलाय.

न्यूझीलंडमधील राजदूत, हॉलिवूड स्टार्स यांच्या उपस्थितीत न्यूझीलंडच्या राजधानीत 'सत्यशोधक' सिनेमाचा रेड कार्पेट प्रीमियर फेब्रुवारी २०२४ मध्ये रंगणार आहे. मराठी सिनेसृष्टीत प्रथमच ही घटना घडली आहे. त्यामुळे सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

सत्यशोधक टॅक्स फ्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 'सत्यशोधक' सिनेमा टॅक्स फ्री झाल्याची घोषणा केलीय.CMO एकनाथ शिंदेंनी ट्विटरवर

'सत्यशोधक' मराठी चित्रपटास आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी

असं जाहीर करुन ही घोषणा केलीय. यामुळे सत्यशोधक सिनेमा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. याशिवाय ग्रामीण भागातील अनेक लोकं सत्यशोधक सिनेमा पाहतील, यात शंका नाही.

'सत्यशोधक'मधील कलाकार

'सत्यशोधक' चित्रपटात महात्मा जोतीराव फुले यांची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप कुलकर्णी यांनी साकारली आहे. तर आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या राजश्री देशपांडे सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत आहेत. तसेच रवींद्र मंकणी, रवी पटवर्धन, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा या दमदार कलाकारांची त्यांना लाभली आहेत.

या चित्रपटाची पटकथा तयार करण्यासाठी राज्य शासनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकांचा संदर्भ घेण्यात आला आहे आणि महात्मा जोतीराव फुलेंचे गाढे अभ्यासक माननीय साहित्यिक प्रा.हरी नरके यांच्या मार्गदर्शनाखाली हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१२ कोटींची रोकड, ६ कोटींचे दागिने अन्...; काँग्रेस आमदाराकडे आढळलं घबाड, जप्त केलेल्या मुद्देमालाचा आकडा वाचून व्हाल थक्क

"माझ्या मुलाला वाचवा मी..." मुलाच्या जन्मावेळेस ढसाढसा रडू लागला गोविंदा; "गर्भलिंग निदान चाचणी.."

Ganesh Chaturthi 2025: बाप्पाला तळणीचे की उकडीचे कोणते मोदक अर्पण करावे? वाचा पद्म पुराणात काय सांगितले

Crime News : नाशिक रोडला दरोड्याची तयारी करणाऱ्या पाच संशयितांना अटक; मोठा शस्त्रसाठा जप्त

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT