Sayali Sanjeev and ashok saraf relation as daughter and father she called him pappa 
मनोरंजन

Sayali Sanjeev: वडिलांनंतर अशोक मामांना 'पप्पा' म्हणते सायली.. तिनंच सांगितली गोड आठवण..

अभिनेत्री सायली संजीव आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या नात्यातील ही गोड आठवण..

नीलेश अडसूळ

sayali sanjeev : लाखो तरुणांच्या मनाला भुरळ घालणारी अभिनेत्री सायली संजीव गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चेत आहे. तिचा 'हर हर महादेव' चित्रपट असो किंवा नुकताच येऊ घातलेला 'गोष्ट एका पैठणीची'.. सध्या संपूर्ण वातावरण सायलीमय झाले आहे. बऱ्याच ठिकाणी ती प्रमोशनसाठी फिरताना दिसतेय. आशातच एका मुलाखतीत तिने एक भावूक आठवण सांगितली आहे. गेल्यावर्षी तिचे वडिलांचे निधन झाले. त्यावेळी सायली खूप खचली होती, आज तिच्या आयुष्यात वडिलांच्या जागी असणाऱ्या अशोक मामा म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याविषयी ती भरभरून बोलली आहे. अनेक गोड आठवणी तिने यावेळी सांगितल्या.

(Sayali Sanjeev and ashok saraf relation as daughter and father she called him pappa

)

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सायलीने अशोक मामांशी असलेल्या तिच्या नात्याबाबत अनेक गोष्टी उलगडल्या. यावेळी 'तुझ्या करियर मध्ये तुला खूप लोक भेटले असतील, पण ज्यांच्याकडून तुला खूप काही शिकायला मिळालं असं कोण आहे?' असा प्रश्न तिला विचारला जातो. यावेळी ती अशोक सराफ यांचं नाव घेते आणि म्हणते 'या नावाशिवाय माझं म्हणणं पूर्णत्वास येणार नाही.'

पुढे ती म्हणते, ते मला मुलगी मानतात. कारण झी मराठी वरील 'काहे दिया परदेस' सिरियल सुरू झाल्यावर अनेकांना मी निवेदिता सराफ यांच्यासारखी दिसत असल्याने मी अशोक मामा आणि निवेदिता सराफ यांचीच मुलगी असल्याचे वाटले. हे ऐकून अशोक मामांनी देखील ती मालिका पाहिली आणि आपल्याला मुलगी असती तर ती अशीच असती म्हणत त्यांनीही मला मुलगी मानलं. एकदा मी सहज त्यांना विचारलं की मी तुम्हाला काय म्हणू.. त्यावर ते म्हणाले तुझ्या वडीलांना तू बाबा म्हणतेस तर मला पप्पा म्हण..

पुढे ती म्हणाली, 'माझे वडीलही माझ्या काममध्ये कधी इतकं लक्ष देत नव्हते तितकं अशोक पप्पा देतात. मी काय करतेय, काय शिकलेय, काय शिकतेय हे सगळं त्यांना माहीत आहे. माझं प्रत्येक काम ते आवर्जून पाहतात, प्रत्येक मुलाखत ऐकतात. ते मला मुलगी मानत असले तरी ते माझे उत्तम टीकाकार आहेत. मी करायला हवं, कसं वागायला हवं तिथपासून ते काय चुकलं, कुठे काय चुकीच विधान केलं ही सगळं ते मला सांगत असतात. आमच्यातलं नातं इतकं घट्ट आहे की माझा फोन नंबर ही त्यांना पाठ आहे.' अशा आठवणी सायलीने सांगितल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT