sayali sanjeev and nitish chavan romantic song tula pahun pahun yad lagla  sakal
मनोरंजन

सायली संजीवसोबत जोडलं नितीश चव्हाणचं नाव? रोमान्स करताना दिसले दोघे..

अभिनेत्री सायली संजीवच्या या व्हिडिओने चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत.

नीलेश अडसूळ

sayali sanjeev : लाखो तरुणांच्या मनाला भुरळ घालणारी अभिनेत्री सायली संजीव गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चेत आहे. सायलीच्या 'गोष्ट एका पैठणीची' या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यापासून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे. त्यातच सायलीचा एक रोमॅन्टिक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना बरेच प्रश्न पडले आहेत. शिवाय सायली आणि सोबत नाचणाऱ्या या अभिनेत्याचे काय कनेक्शन आहए यावरही चर्चा सुरू आहे.

(sayali sanjeev and nitish chavan romantic song tula pahun pahun yad lagla)

अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता नितीश चव्हाण या दोघांचं एक रोमॅन्टिक अंदाजातील रील व्हायरल झालं आहे. 'तुला पाहुन पाहुन याड लागलं' या गाण्यावर दोघेही भन्नाट नाचले आहए. या गाण्यातील त्यांच्या रोमॅंटिक अंदाजावर चाहतेही भलतेच फिदा झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच सायली आणि नितीश चे हे गाणे प्रदर्शित झाले होते. याच गाण्यावर त्यांनी रील करत शेयर केली आहे. या व्हिडीओला त्यांनी, 'तुला पाहुन याडं लागलं...' असे कॅप्शन दिलेआहे .

सायली प्रमाणेच नितीशचाही चाहता वर्ग मोठा आहे, तो उत्तम डान्सर आहे. नितीश आणि सायलीच्या या गाण्यात दोघांची केमिस्ट्री इतकी रंगली आहे. या दोघांमध्ये काही सुरु आहे का, असे प्रश्नहि चाहत्यांना पडू लागले आहेत. पण हि केमिस्ट्री केवळ गाण्यापूरती मर्यादित असल्याचेही आपल्याला दिसते. कारण नितीश आणि अभिनेत्री श्वेता राजन गेली काही वर्ष एकमेकांच्या प्रेमात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द, गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याची माहिती

Latest Marathi News Update: राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

IND vs AFG: अफगाणिस्तानला गिल-ईशानने चोपलं, गोलंदाजांनी रोखलं; भारताचा दुसऱ्या वनडेत दणदणीत विजय, मालिकाही खिशात

Pune Crime : 'त्या' जीम व्यावसायिकाला मारण्यासाठी २० लाख रुपयांची दिली होती सुपारी; आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ

Pune Crime : अमानुष छळ करत मूत्र पाजले, मारहाण करत विजेचे शॉकही दिले; भोंदुबाबाकडून महिलेचा छळ

SCROLL FOR NEXT