Sayali sanjeev participate in bus bai bus show on zee marathi host by subodh bhave  sakal
मनोरंजन

Sayali sanjeev: झोपेतून उठली की चहा ऐवजी ही' गोष्ट घेते सायली संजीव, ती नसेल तर..

सायली संजीव झी मराठी वरील बस बाई बस या कार्यक्रमात सहभागी झाली होती.

नीलेश अडसूळ

sayali sanjeev : गेली काही दिवस सुबोध भावेच्या 'बस बाई बस' या कार्यक्रमाची भलतीच चर्चा आहे. झी मराठी वाहिनीवरील 'बस बाई बस' या नव्या मालिकेत महिला कलाकार, राजकारणी सहभागी होतात यावेळी त्यांना इतर महिलांच्या मनातले प्रश्न विचारले जात आहेत. अशी भन्नाट संकल्पना असणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे (subodh bhave) करत आहे. या कार्यक्रमात आजवर अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. नुकतीच या कार्यक्रमात अभिनेत्री सायली संजीव हिने हजेरी लावली होती. यावेळी तिने वैयक्तिक आयुष्याबाबत बराच खुलासा केला.

(Sayali sanjeev participate in bus bai bus show on zee marathi host by subodh bhave )

एरव्ही सकाळी झोपेतून उठल्यावर काहीजन चहा, कॉफी घेतात तर काही जण आधी ब्रश मग आंघोळ आणि मगच चहा घेतात. प्रत्येकाच्या अशा काही सवयी असतात. पण सायलीची (sayali sanjeev) सवय जरा जबच आहे. सायलीला सकाळी उठल्यावर ब्रश करण्याच्याही आधी टीव्हीचा रिमोट हातात लागतो. तिला उठल्यावर बातम्या पहायची सवय आहे. तिच्या वडिलांनी तिला ही सवय लावल्याचं सायलीने यावेळी सांगितलं. सायली म्हणाली, 'दिवसभर आपण इतक्या कामांमध्ये अडकलेले असतो की आपल्याला बातम्या पाहता येत नाही. त्यामुळे झोपेतून उठल्यावर जितकं शक्य होईल तितकं पाहायचं. ज्यामुळे बाहेर काय सुरू आहे, याबाबत आपल्याला समजते. ही सवय मला बाबांनी लावली आहे.'

तिचं हे ऐकूण शरद केळकर म्हणतो, 'ती एवढं काम करते त्यामुळे ती कुठेना कुठे दिसतेच. त्यामुळे ती स्वतःला पाहण्यासाठी टीव्ही लावते आणि आपण कुठे दिसतोय का ही शोधत असते.' या वाक्यावर सगळेच हसू लागतात. सायली लवकरच 'हर हर महादेव' या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी ‘महाराणी सईबाई भोसले’ यांच्या भूमिकेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ethanol Blended Petrol : 'इथेनॉलशिवाय कारखानदारी टिकणे अवघड'; मुख्यमंत्री फडणवीसांनी पेट्रोलमुळे वाहनांचं नुकसान कसं होतं तेही सांगितलं!

शूटिंगच्या पहिल्या दिवशी मृणाल दुसानिस खूप रडलेली, 'माझिया प्रियाला...' मालिकेबद्दल बोलताना म्हणाली; “ आईकडे पाहत मी रडत होते”

RTOने दंडात्मक कारवाईनंतर कागदपत्रे बराच वेळ दिली नाही, चालकानं समृद्धीवर ट्रकच आडवा लावला; वाहतूक तासभर ठप्प, VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गृहमंत्री अमित शहा संसदेत निवेदन देणार? 'या' 2 मोठ्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक, अधिवेशनाचा शेवटचा आठवडा ठरणार वादळी!

Yavatmal Loan Waiver Issue: कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

SCROLL FOR NEXT