

Latest Marathi News Live Update
esakal
लॅटिन अमेरिकेतील कोलंबियाच्या पश्चिम भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. भूकंपामुळे अनेक ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे भीतीपोटी नागरिकांना घरं आणि इमारतींमधून बाहेर पडावं लागलं. या भूकंपाचे धक्के शेजारील इक्वेडोरमध्येही जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.४ इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कोलंबियातील सॅन होसे देल पालमार परिसरात असल्याचं सांगण्यात आलं आहे. हा भाग राजधानी बोगोटापासून सुमारे ४०० किलोमीटर पश्चिमेला आहे. दरम्यान, भूकंपामुळे नेमकं किती नुकसान झालं किंवा किती जण जखमी झाले, याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून तातडीने देण्यात आलेली नाही.