Sayali Sanjeev said she likes politician sushma andhare speech sakal
मनोरंजन

Sayali Sanjeev: सायली संजीव पडली सुषमा अंधारेंच्या प्रेमात.. म्हणाली, तुम्ही जे बोलता...

एका कार्यक्रमात सायली आणि सुषमा अंधारे समोरासमोर आल्या..

नीलेश अडसूळ

Sayali Sanjeev: देखणं रूप, दमदार अभिनय यामुळे कायमच चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. सध्या तिचे इतके चित्रपट आले आहेत की नवा सिनेमा येणार म्हणजे त्यात सायली हवीच असे समीकरण झाले आहे.

शिवाय सायलीच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. सायली सोशल मिडियावरही बरीच सक्रिय असते. ती आपली वैयक्तिक मतं मांडत असते. बऱ्याचदा तिला टिकेला सामोरे जावे लागते पण सायली सगळ्यांना रोखठोक उत्तरं देते.

पण आज मात्र सायली वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ते म्हणजे सायली लवकरच राजकीय विश्वात पदार्पण करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच तिने शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचे भरभरून कौतुक केले आहे.

(Sayali Sanjeev said she likes politician sushma andhare speech)

सायली सध्या चित्रपटासोबतच राजकारणातही सक्रिय असते. ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेच्या उपाध्यक्ष पदी आहे. पण लवकरच सायली निवडणुकीत उभं राहण्याची पण चिन्हं आहेत.

कारण नुकतच एका मुलाखतीत सायली म्हणाली की, मी जर एखाद्या पक्षात आहे तर त्याच पक्षाचे विचार मी मांडणार. मला जर एखादी गोष्ट इतरांची आवडली तर मी कौतुकही करते. पण पक्षाचे विचार सोडून चालत नाही. शिवाय भविष्यात संधी मिळाली तर मी निवडणूक ही लढवेन. कारण मला समाजाचे काम करायला आवडतेच.''

यावेळी सायली सोबत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेही उपस्थित होत्या. सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीमध्ये सायलीने चक्क त्यांचं कौतुक केलं. सायली म्हणाली, ''सुषमा ताई तुम्ही जे काही बोलता ते मला खूप आवडतं. तुमचे खूप खूप धन्यवाद. मला हे काही वेळापूर्वीच बोलायचं होतं. पण राहून गेलं.'' सायलीच्या कौतुकानंतर सुषमा अंधारे यांच्या खुश झाल्या. सध्या सायलीच्या या कौतुकाची बरीच चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT