Sayali Sanjeev shared painful emotional post for her father
Sayali Sanjeev shared painful emotional post for her father sakal
मनोरंजन

Sayali Sanjeev: मला हवा आहेस तू.. परत ये.. वडिलांसाठी सायली संजीवची भावूक पोस्ट

नीलेश अडसूळ

Sayali Sanjeev : लाखो तरुणांच्या मनाला भुरळ घालणारी अभिनेत्री सायली संजीव गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चेत आहे. तिचा 'हर हर महादेव' चित्रपट असो किंवा नुकताच येऊ घातलेला 'गोष्ट एका पैठणीची'.. सध्या संपूर्ण वातावरण सायलीमय झाले आहे. बऱ्याच ठिकाणी ती प्रमोशनसाठी फिरताना दिसतेय. आशातच तिने एक भावूक पोस्ट शेयर केली आहे. गेल्यावर्षी तिचे वडिलांचे निधन झाले. आज तिच्या वडिलांना जावून एक वर्ष झाले. या निमित्ताने डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट सायलीने बाबांच्या आठवणीत शेयर केली आहे.

(Sayali Sanjeev shared painful emotional post for her father)

गेल्यावर्षी म्हणजे 30 नोव्हेंबर 2021 रोजी सायली संजीवच्या वडिलांचे निधन झाले. यावेळी सायलीने बाबांचे काही फोटो शेयर करत 'बाबा, थांब ना रे तू.. बाबा, जाऊ नको दूर,' अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आज त्या दुःखद घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्या निमित्ताने सायली पुन्हा एकदा भावूक झाली आहे. एक पोस्ट लिहीत त्याने आपल्या वडिलांना साद घातली आहे.

“संजीव… राहिले की एक वर्ष तुझ्याशिवाय.. खूप झालं बास..नाही शक्य.. आजही मला हवा आहेस तू.. परत ये ना… प्लीझ.. साद हि घालते लाडकी तुला.. जगण्या तू दिला माझ्या जीवा अर्थ खरा.. बाबा…”, अशी अत्यंत भावनिक पोस्ट सायली संजीवने शेयर केली आहे आहे. त्यावर अनेकांनी तीला धीर देणाऱ्या, आधार देणाऱ्या कमेंट केल्या आहेत. तिचे बाबा गेल्यानंतर ती खूप खचली होती. पण त्या दुःखातून सावरत ती पुढे गेली. आज तिचे बाबा जाऊन एक वर्ष झालं, म्हणून ती पुन्हा एकदा बाबांच्या आठवणीत गहिवरली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पती मुख्यमंत्री बनला अन् पत्नीचा दुसऱ्याच दिवशी आमदारकीचा राजीनामा; राज्यात मोठी घडामोड!

Maharashtra Rain update: राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज

मोठी बातमी! फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची जुनी अप्रकाशित बखर; नेमकं काय आहे बखरीत आणि कशी मिळाली ही बखर?

RSS on BJP : ''ज्यांच्यात अहंकार होता त्यांना २४१ वर रोखलं, जे रामविरोधी होते त्यांना तर...'' आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांचं मोठं विधान

‘मराठी’तील 2 लाख विद्यार्थ्यांनी धरली ‘इंग्रजी’ची वाट! ठाणे, मुंबईत मराठीच्या तुलनेत ‘इंग्रजी’चे दुप्पट ते आठपट विद्यार्थी; ZP शाळांमध्ये सेमी इंग्रजी का नाही?

SCROLL FOR NEXT