scam 2003 trailer sony liv released on 1 september based on abdul karim telgi bharat jadhav shashank ketkar  SAKAL
मनोरंजन

Scam 2003 Trailer: देशाची अर्थव्यवस्था कुबेरचा खजाना असेल तर... स्कॅम 2003 चा ट्रेलर, भरत जाधवची खास भुमिका

Scam 2003 मध्ये अब्दुल करीम तेलगीचा ३० हजार कोटींचा घोटाळा उघडकीस येणार आहे

Devendra Jadhav

गेल्या अनेक दिवसांपासुन Scam 2003 या नवीन वेबसिरीजची खुप चर्चा आहे. या वेबसिरीजच्या माध्यमातुन अब्दुल करीम तेलगीचा ३० हजार कोटींचा घोटाळा उघडकीस येणार आहे.

Scam 2003 च्या ट्रेलरची सर्वांना उत्सुकता होती. या सिरीजमध्ये कोण काम करणार? कोणता कलाकार तेलगीची भुमिका साकारणार? या सर्व गोष्टींवरचा पडदा ट्रेलरच्या माध्यमातुन उडालाय.

(scam 2003 trailer sony liv released on 1 september based on abdul karim telgi)

Scam 2003 मध्ये मराठी कलाकरांची मांदियाळी

अब्दुल करीम तेलगीच्या भारतातील सर्वात मोठ्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याची कहाणी, ज्याने देशाला त्याच्या अकल्पनीय प्रमाणाने धक्का दिला. Scam 2003 या शो चा ट्रेलर रिलिज झाला असून या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे. इतकंच नव्हे तर प्रेक्षकांसाठी आनंदाची बाब म्हणजे या ट्रेलर मध्ये अनेक सुप्रसिद्ध मराठी कलाकार दिसत आहेत. अभिनेता शशांक केतकर, निखिल रत्नपारखी, भरत दाभोळकर, समीर धर्माधिकारी आणि प्रेक्षकांचा लाडका भरत जाधव देखील या शो मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हा कलाकार साकारणार तेलगीची भुमिका

ज्येष्ठ रंगभूमी अभिनेते गगन देव रियार या मालिकेत तेलगीची भूमिका साकारताना आहेत अशी चर्चा आहे. हंसल मेहता शोरनर आहेत. Scam 2003 ची निर्मिती समीर नायर यांच्या Applause Entertainment द्वारे केली आहे आणि 1 सप्टेंबर रोजी ही सिरीज SonyLIV वर टेलिकास्ट होईल.

हंसल मेहता यांनी याआधी नेटफ्लिक्सवर स्कूप सिरीज दिग्दर्शित केले आहेत. या क्राईम थ्रिलर सिरीजमध्ये करिश्मा तन्ना एका शोध पत्रकाराच्या मुख्य भूमिकेत होती.

कधी आणि कुठे पाहायला मिळणार स्कॅम 2003

स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी, स्टुडिओनेक्स्टच्या सहकार्याने अॅप्लॉज एंटरटेनमेंट द्वारे निर्मित आहे. ही मालिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक हंसल मेहता हे या शो चे सर्वेसर्वा असून तुषार हिरानंदानी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. पाहायला विसरू नका 1 सप्टेंबर रोजी फक्त Sony LIV वर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT