Ankita Lokhande
Ankita Lokhande Instagram
मनोरंजन

लस घेताना घाबरलेल्या अंकिताने घेतलं देवाचं नाव; चाहते म्हणाले..

स्वाती वेमूल

सरकारने लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकासाठी कोरोना प्रतिबंधक लस Covid 19 vaccine देण्यास सुरूवात केल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी पहिली डोस घेतला. अभिनेत्री अंकिता लोखंडेनंही Ankita Lokhande लशीचा पहिला डोस घेतला असून त्याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला. लस घेण्याआधी घाबरलेली अंकिता या व्हिडीओत देवाकडे प्रार्थना करताना दिसतेय. (Scared Ankita Lokhande starts praying before getting Covid 19 vaccine watch video)

या व्हिडीओच्या सुरुवातीला एक नर्स अंकिताला काही सूचना देत असते आणि ते ऐकून अंकिता म्हणते, "बाप रे"! त्यानंतर लस देत असताना ती देवाचं नाव घेत असते. 'लशीचा पहिला डोस मी घेतला, तुम्हीसुद्धा लवकराच लवकर घ्या', असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओवर अनेकांनी विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अंकिताची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री रश्मी देसाई हिने हसण्याचे इमोजी कमेंट बॉक्समध्ये पोस्ट केल्या आहेत. तर शंकर महादेवन यांचा मुलगा आणि गायक शिवम महादेवन यानेदेखील कमेंट केलं. 'तू अजूनही लहान आहेस', अशीही कमेंट अनेकांनी तिच्या व्हिडीओवर केली.

हेही वाचा : राज कपूर-दिलीप कुमार यांच्या हवेली मालकांना अंतिम नोटीस; पाकिस्तान सरकारची कारवाई

अंकिताच्या या व्हिडीओला अवघ्या पाच तासांत सात लाख ७५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणारी अंकिता नेहमीच विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. इन्स्टाग्रामवर तिने तीस लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : विभव कुमार यांना आजच कोर्टासमोर हजर केलं जाणार

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, दु:ख सहन न झाल्याने सहकलाकारानेही संपवलं जीवन!

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

SCROLL FOR NEXT