The screening of Baban will be held in Singapore 
मनोरंजन

'बबन'ने गाठले थेट सिंगापुर

सकाळ डिजिटल टीम

'कस्संं?...बबन म्हणेन तसं' म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला खूळ लावणाऱ्या, तसेच सलग चौथ्या आठवड्यातदेखील हाऊसफुल ठरत असलेल्या 'बबन'ने आता थेट सिंगापूर गाठले आहे. सिंगापूरच्या मराठी सिनेरसिकांनादेखील या सिनेमाचे आस्वाद घेता यावा, यासाठी तेथील स्थानिक प्रेक्षकांकडून 'बबन'च्या या खास स्क्रीनिंगची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार आज 15 एप्रिल ला सिंगापूरमधील मराठी प्रेक्षकांसाठी 'बबन'ची ही भलीमोठी स्क्रिनिंग आयोजित केली जाणार आहे. 

ग्रामीण जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमात भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव यांची प्रमुख भूमिका आहे. 'बबन' सिनेमातील संवाद आणि गाण्यांनादेखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभत असून, हा सिनेमा मनोरंजनाबरोबरच सामाजिकतेचे अंजनदेखील प्रेक्षकांच्या डोळ्यात घालत आहे. तसेच, वर्षाच्या मध्यान्हात सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी सिनेमाच्या यादीत 'बबन'चा समावेश झाला आहे. द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तूत, चित्राक्ष फिल्म्स निर्मित आणि भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित 'बबन' चा हा गावराण बाणा सिंगापूरमध्येदेखील आपली कमाल दाखवणार हे निश्चित!

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं उच्चांकापासून 26 हजारांनी स्वस्त! पाहा ताजा भाव; पुढे सणासुदीच्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?

पत्नीच्या खून प्रकरणी पती-सासऱ्यासह ८ जण तुरुंगात गेले, १२ वर्षांनी जिवंत सापडली महिला

MPSC Exam Success Story : शेतकरी बापाची लेक अन् आई पोलिसात! जाधववाडीच्या निकिताची MPSC मध्ये गगनभरारी, महसूल सहाय्यकपदी निवड

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

SCROLL FOR NEXT