seema deo death funeral marathi and bollywood celebrities not attend her funeral son ajinky deo comment  SAKAL
मनोरंजन

Seema Deo: सीमा देव यांच्या अंत्यदर्शनाला मराठी कलाकारांसह बॉलिवूडकरांनी फिरवली पाठ, अजिंक्य देव म्हणतात...

सीमा देव यांच्या अंत्यसंस्काराला मराठी आणि हिंदी कलाकारांनी पाठ फिरवल्याचं चित्र दिसतंय.

Devendra Jadhav

सीमा देव यांचं आज वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं. सीमा देव या गेल्या अनेक वर्षांपासुन अल्झायमर सारख्या गंभीर आजाराने ग्रस्त होत्या. सीमा देव यांच्या निधनाने देव कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झालीय.

अशातच सीमा देव यांच्यावर दादरच्या वैकुंठ स्मशानभुमीत अंत्यसंस्कार सुरु आहेत. पण सीमा देव यांच्या अंत्यसंस्काराला मराठी आणि हिंदी कलाकारांनी पाठ फिरवलेली दिसतेय.

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्यावर आज दादर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. याआधी अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव मुंबईच्या वांद्रे पश्चिमेकडील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले यावेळी बॉलिवूडमधून फक्त जावेद जाफरी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्दर्शक राजदत्त, संगीतकार अजय आणि अभिनेत्री पूजा पवार, नेहा पेंडसे यांनीच पार्थिवाचं दर्शन घेतलं.

मराठी सिनेमा सृष्टी आणि बॉलिवूडमधून अजूनपर्यंत एकही मोठा स्टार अंत्यदर्शनाला आलेला दिसला नाही. दरम्यान, यावेळी सीमा देव यांचे कुटुंब आणि इतर नातेवाईक आणि कर्मचारी यांना अश्रू अनावर झाले.

आईच्या निधनामुळे अजिंक्य देव झाला भावुक, दिली प्रतिक्रिया

आईच्या निधनाबद्दल बोलताना अजिंक्य देव भावुक झालेले दिसले. त्यांनी प्रतिक्रिया दिली की, "आज माझ्या आईचं सीमा देव यांचं निधन झालं. आज सकाळी ७ वाजता ती गेली. गेली तीन चार वर्ष ती आजारामुळे आयुष्याशी संघर्ष करत होती. तिला विसरण्याचा त्रास सुरु झाला होता.

बाबांना जाऊन आता दीड वर्ष होत आलं होतं आणि आईला काही आठवत नसे ती सगळं विसरून गेलेली पण ती होती. आणि आज आता असं झालंय की दोघंही नाहीयेत. आणि त्यांच्या जाण्याने एवढी मोठी पोकळी कुटुंबात निर्माण झाली आहे की मी बोलू नाही शकत सांगू नाही शकत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Waiver Alert: कर्जमाफी की सिबिलवर डाग? ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ योजनेतील OTS नोंदीमुळे ५६ लाख शेतकऱ्यांच्या पतक्षमतेवर संकट

Neeraj Chopra CWG26: नीरज चोप्राने पाकिस्तानी अर्शद नदीमवर कुरघोडी केली, पण ८४ मीटरचे पात्रता अंतर गाठण्यात अपयशी; फायनलमध्ये पोहोचला की नाही?

School Chicken Biryani: शाळकरी मुलांना मिळणार चवदार चिकन बिर्याणी! तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

सलमान खानने विकला कोट्यवधींचा फ्लॅट; तरीही हातात पडला फक्त 'एवढाच' नफा!

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये आज पुन्हा पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT