Seema Khan changes her name on Instagram after divorce from Sohail Khan Google
मनोरंजन

Divorce नंतर सीमा खाननं बदलली ओळख; इन्स्टाग्रामवर नव्या नावाची चर्चा

बान्द्रा येथील फॅमिली कोर्टात घटस्फोटाचा अर्ज करायला आलेले सीमा आणि सोहल खान दिसले अन् त्यांच्या विभक्त होण्याची चर्चा सुरू झाली होती.

प्रणाली मोरे

सलमान खानच्या(Salman Khan) दुसऱ्या अन् धाकट्या भावाचा म्हणजे सोहेल खानचाही(Sohail Khan) २६ वर्षांचा संसार आता तुटला आहे. ही बातमी जेव्हा आली तेव्हा अनेकांचा आधी आपल्या कानावर विश्वासच बसला नाही. कारण सीमा आणि सोहेल खान या कपलमध्ये असं काही गेल्या काही दिवसांत बिनसत असल्याची साधी अफवा देखील पसरलेली नव्हती. त्यामुळे दोघे थेट फॅमिली कोर्टात घटस्फोटाचा(Divorce) अर्ज करायला आलेले दिसले तेव्हा प्रत्येकासाठीच हा मोठा धक्का होता.

घटस्फोटानंतर आता सीमा खानची पूर्ण ओळखचं बदलेली आहे. गेली २६ वर्ष ज्या मुस्लीम धर्माचा स्विकार करुन,सासरच्या कुटुंबाच्या सर्व परंपरा-संस्कृतीचं पालन करताना दिसलेली सीमा खाननं इन्स्टाग्रामवर तिच्या नवीन नावातून आपली ओळख बदललल्याचं जाहिर केलं आहे. काय आहे तिचं सीमा खानचं नवीन नाव? का रंगलीय सोशल मीडियावर त्याची चर्चा? चला जाणून घेऊया सविस्तर.

सीमानं तिच्या माहेरचं नाव आता आपल्या नावापुढे जोडलं आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गेलं तर तिचं नावं आता दिसतं सीमा किरण सचदेव.गेल्याच आठवड्यात ब्रान्द्रा फॅमिली कोर्टात सीमा सचदेव आणि सोहेल खान दिसले होते. सूत्रांनीचं तेव्हा मीडियाला माहिती देताना म्हटलं होतं,''सीमा सचदेव आणि सोहल खान कोर्टात घटस्फोटाचा अर्ज सादर करायला हजर राहिले आहेत. घटस्फोट घेत असले तरी त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध कायम आहेत''. सीमा सचदेवनं एका इंग्रजी वेबसाईटशी बोलताना म्हटलं होतं,''आम्ही कायम मित्र राहू पण मी आता सिंगल आहे''.

सोहेल आणि सीमानं १९९८ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. त्या दोघांना निर्वाण आणि योहान ही दोन मुलं आहेत. सीमाच्या कुटुंबाकडून लग्नाला विरोध असल्यामुळं दोघांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. २०१७ मध्ये सीमा खाननं The Fabulous Lives Of Bollywood Wives या वेब शो मध्ये सहभाग घेतला होता. त्या शो मध्येच खरंतर सीमा-साहिल वेगळे राहत असून त्यांची मुलं दोघांकडे राहतात याचा खुलासा झाला होता. त्या शो मध्ये सीमानं ''आपण लहान वयात घेतलेले निर्णय चुकतात अनेकदा,नाती वेगळी वळणं घेतात,पण असं असलं तरी आमच्या मुलांमुळे आमचं जग बदललं आणि आम्ही खूश आहोत'' असं देखील वेब शो मध्ये नमूद केलं होतं. ''सोहेल आणि मी एकत्र राहत नसलो तरी आमचं एक कुटुंब आहे,आणि त्या सोबत आम्ही खूश आहोत हे सगळ्यात अधिक महत्त्वाचं आहे''. असं देखील सीम सचदेव म्हणाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार; राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

SCROLL FOR NEXT