senior lawyer Ujjwal Nikam and ias office writer vishwas patil in marathi serial Appi Amchi Collector on zee marathi  sakal
मनोरंजन

Appi Amchi Collector: ज्येष्ठ वकील उज्वल निकम करणार अभिनय! 'या' मालिकेत दमदार एंट्री..

जेष्ठ विशेष सरकारी वकील उज्वल निकम आणि लेखक आणि IAS ऑफिसर विश्वास पाटील एकत्र दिसणार..

नीलेश अडसूळ

marathi serial latest update: जेष्ठ विशेष सरकारी वकील उज्वल निकम आणि लेखक आणि IAS ऑफिसर विश्वास पाटील अप्पी आमची कलेक्टर मालिकेच्या निमित्ताने प्रथमच प्रथमच कॅमेरा फेस करणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील एका लोकप्रिय मालिकेत ते एका विशेष भूमिकेत दिसणार आहेत.

(senior lawyer Ujjwal Nikam and ias office writer vishwas patil in marathi serial Appi Amchi Collector on zee marathi )

झी मराठी ही अशी वाहिनी आहे जी नेहेमीच वेगवेगळे विषय हाताळत आली आहे, असाच वेगळा विषय घेऊन सुरु झालेली मालिका म्हणजे 'अप्पी आमची कलेक्टर'. अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, ही ती मुलगी जी ग्रामीण भागातील खेडे गावात रहाते. जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन नाही.

पण तिचं ध्येय खुप मोठ्ठ आहे. तिला येणा-या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होते. अशी ही संघर्ष कथा आहे. या संघर्षात तिचे बापू, नवरा अर्जुन, भाऊ दिप्या तिच्या बाजूने ठामपणे उभे राहिलेले आपण पाहिलं.

ही मालिका आता चर्चेचं विषय होतेय आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधणारी ठरत आहे, कारण अप्पीने नुकतीच UPSC ची परीक्षा पहिल्या नंबरने पास केली आहे, आणि आता तिचं कलेक्टर बनण्याचं स्वप्न दृष्टीपथात येणार आहे.

पण यासाठी तिला अजून एका परीक्षेमधून जावं लागणार आहे ते म्हणजे तिचा interview जो घेणार आहेत, जेष्ठ विशेष सरकारी वकील 'उज्वल निकम' आणि लेखक आणि IAS ऑफिसर 'विश्वास पाटील' या मालिकेच्या निमित्ताने हे दोन ऑफिसर्स टेलीव्हिजनवर प्रथमच मालिकेत खरीखुरी भूमिका साकारताना दिसणार आहेत.

त्यामुळे मालिका अधिकच रंजक वळवणार येऊन ठेपली आहे. शिवाय समाजीक जबाबदऱ्यांचे भान असणारे आणि शासकीय कामकाज जवळून पाहणारे उज्वल निकम आणि विश्वास पाटील तिची कशी मुलाखत घेणार, कसा अभिनय करणार हे पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : पीडीपी नेत्या इल्तिजा मुफ्ती यांनी बिजबेहरा येथील जाबलीपुरा फळ बाजारात फळ उत्पादकांच्या आंदोलनात सहभाग घेतला

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT