Sameer Wankhede esakal
मनोरंजन

Sameer Wankhede Case Update: शाहरुखच्या चॅटबद्दल वानखेडे बचावात्मक पवित्र्यात! आधीच वरिष्ठांना...

आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये समीर वानखेडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये सीबीआयने एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. आर्यन खान ड्रग्जप्रकरणी सीबीआयने समीर वानखेडे यांची शनिवारी आणि रविवारी चौकशी केली. शनिवारी अडीच तास तर रविवारी पाच तास चौकशी करण्यात आली. दरम्यान आजच्या चौकशीत मोठी माहिती समोर आली आहे.

समीर वानखेडे यांनी शाहरुख खान सोबत झालेल्या चॅटची वरीष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली नव्हती, असा दावा एसीबीने केला होता. समीर वानखेडे यांनी ही चॅट न्यायालयात दाखल केली. त्यानंतर ती अधिकाऱ्यांना कळाली होती. मात्र यासंबधी माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे.

शाहरुख खान सोबत केलेलं चॅट वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून लपलेले नव्हते. या सांभाषणबद्दल(चॅट) एनसीबीचे डीजी आणि डीडीजी यांना कल्पना होती असं खासगीत बोलताना समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे.

शाहरुख खान सोबतच्या चॅटची एक प्रत त्यांनी कोर्टात सादर केली होती. तर या चॅटची माहीती वरिष्ठ अधिकाऱ्यांना नसल्याचं सांगितलं जात होतं. परंतु एनसीबीचे डीजी आणि डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांना याची माहिती होती असं स्पष्टीकरण समीर वानखेडे यांच्याकडून देण्यात आलं आहे. तर गरज पडल्यास मुंबई उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे. याबाबतचे वृत्त 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने दिले आहे.

सीबीआयचे आरोप -

१) सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यात समीर वानखेडे यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्यात के. पी. गोसावी हा वानखेडे यांच्यासाठी शाहरूख खानच्या सचिवाशी डील करत होता.

२) वानखेडेंच्या सांगण्यावरून गोसावीने आर्यन प्रकरणात २५ कोटींची मागणी केली होती. या रकमेच्या बदल्यात आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अडकवणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते.

३) वानखेडे यांनी गोसावीला सौद्याच्या पैशाच्या प्रकरणात संपूर्ण सूट दिली होती. गोसावीने १८ कोटींचा सौदा पक्का केला होता. एवढेच नाही, तर गोसावीने ५० लाख रुपये आगाऊ घेतल्याचा सीबीआयचा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT