Shaakuntalam Twitter Review esakal
मनोरंजन

Shaakuntalam Twitter Review : समंथानं नाद केला, चाहत्यांच्या काळजात गेला! 'शाकुंतलम' भलताच आवडला...

दिग्दर्शकानं शाकुंतलमच्या भूमिकेसाठी समंथाची योग्य निवड केली आहे.तिनंही मोठ्या मेहनतीनं आपली निवड सार्थ ठरवल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

Reactions Release of Shaakuntalam : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही बॉलीवूडमध्ये देखील आता प्रचंड लोकप्रिय झाली आहे. त्याचे कारण मनोज वाजपेयीसोबत तिनं केलेली द फॅमिली मॅन नावाची वेबसीरिज. या सीरिजमधून ती हिंदी प्रेक्षकांना भावली. तिचे त्यांनी तोंडभरुन कौतूक केले. यानंतर पुष्पामध्ये तिनं जो ऊ अंटावा वर डान्स केला होता त्याचीही चर्चा झाली.

समंथा यशाच्या शिखरावर असताना तिच्या वैयक्तिक आयुष्यात वादळं येणं आणि तिच्यावर टीका होणं हे सारं तिनं मोठ्या धैर्यानं पचवलं आहे. आपण काय आहोत हे सोशल मीडियावरुन लोकांना सांगण्यापेक्षा आपले काम प्रामाणिकपणे करत राहणे हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. अशी भावना समंथाची आहे. गेल्या काही दिवसांपासून समंथाचा शाकुंतलम नावाचा चित्रपट चर्चेत आला आहे. आज तो प्रदर्शित झाला असून त्याच्यावरील प्रतिक्रिया समोर आल्या आहे. त्यामध्ये चाहत्यांनी समंथाच्या या नव्या चित्रपटावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

पॅन इंडिया या प्रोजेक्टकडे चाहते डोळे लावून बसले होते. समंथानं या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत चाहत्यांना माहिती आहे. यापूर्वी शाकुंतलमचा व्हायरल झालेला ट्रेलर आणि त्याला मिळालेला प्रतिसादही मोठ्या असल्याचे दिसून आले आहे. साऊथच्या दिग्गज सेलिब्रेटींनी समंथाचे कौतूक केले आहे. तिची प्रशंसा केली आहे. समंथानं केलेला अभिनय भलताच प्रभावी आहे. तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा असे तिच्या सहकलाकारांनी म्हटले आहे. खासकरुन समंथा या चित्रपटामध्ये जे दिसली तिचे ते सौंदर्य चाहत्यांच्या मनात घर करुन बसले आहे.

ट्विटर रिव्ह्यु आता समोर आला असून त्यामध्ये नेटकऱ्यांनी समंथाला फुल्ल मार्क्स दिले आहेत. ते म्हणतात, दिग्दर्शकानं शाकुंतलमच्या भूमिकेसाठी समंथाची योग्य निवड केली आहे.तिनंही मोठ्या मेहनतीनं आपली निवड सार्थ ठरवल्याचे दिसून आले आहे. समंथानं आम्हाला जिंकून घेतले आहे. या भूमिकेसाठी तिची जागा दुसरी कुणी घेऊ शकत नाही. हे तिच्याकडे पाहिल्यावर कळून येते. दुसऱ्या युझर्सनं लिहिलं आहे की, भूमिकेला योग्य न्याय देण्याचे काम समंथानं केले आहे. समंथाच्या भूमिकेसाठी तिला स्टँडिंग ओव्हेशन.

काही युझर्सनं शाकुंतलम नावाची फिल्म ही कौटूंबिक फिल्म असल्याचे सांगत कुटूंबासमवेत आपण ती पाहु शकतो. असे म्हटले आहे. या चित्रपटामध्ये सगळ्याच गोष्टी मोठ्या संयमानं सांगण्यात आल्या आहेत. त्याचे छायाचित्रण, त्यातील पात्रांची वेशभूषा, संगीत हे सारं कमालीचं प्रभावी झाल्याचं प्रेक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे समंथाचा हा चित्रपट वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो अशी प्रेक्षकांची भावना आहे. ती त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT