Shabana Azmi hoists National flag at film festival in Australia rocky aur rani kii prem kahani SAKAL
मनोरंजन

Shabana Azmi: मेलबर्न मध्ये शबाना आझमीने फडकावला तिरंगा, सर्वांसोबत साजरा केला स्वातंत्र्यदिन

अभिनेत्री शबाना आझमीने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर तिरंगा फडकवला आहे

Devendra Jadhav

Shabana Azmi Flag Hosting News: या वर्षी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण होत आहेत. या विशेष प्रसंगी देशभरात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, बी-टाऊनची सुंदर आणि दमदार अभिनेत्री शबाना आझमीने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर तिरंगा फडकवला आहे. मेलबर्न 2023 च्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने शबाना यांनी तिरंगाध्वज फडकावला आहे.

(Shabana Azmi hoists National flag at film festival in Australia)

तिरंगा फडकावण्याचा मिळाला बहुमान

यावेळी बोलताना शबाना म्हणाल्या, “तिरंगा फडकवण्याचा बहुमान मिळाल्याचा मला खूप अभिमान वाटतो, मेलबर्नमध्ये ध्वज फडकावणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही मेलबर्नमध्ये भारतीय चित्रपट आणि कलेचा उत्सव साजरा करण्यासाठी आलो आहोत. असे दिसते की सिनेमा हे सामाजिक बदलाचे साधन असू शकते.

शबाना आझमीचा आगामी सिनेमा

शबाना आझमी या आर. बाल्की यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'घूमर' मध्ये काम करणार आहेत. ज्याचा मेलबर्न 2023 च्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. मेलबर्नमध्ये तिरंगा फडकवताच उपस्थितांमध्ये देशभक्ती आणि एकतेचा भाव गुंजला.

अभिनेत्री शबाना आझमीने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर देशातच नाही तर परदेशातही खूप नाव कमावले आहे.

मेलबर्न 2023 चा इंडियन फिल्म फेस्टिव्हल हा जागतिक व्यासपीठावर भारतीय सिनेमाची चैतन्य आणि विविधता प्रदर्शित करण्यासाठी एक महत्त्वाचा व्यासपीठ आहे. हा महोत्सव 11 ऑगस्टपासून सुरू झाला असून 20 ऑगस्ट रोजी संपणार आहे.

शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांचा लिपलॉक सीन

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि धर्मेंद्र लिप लॉक करताना दिसत आहेत. त्याच्या या सीनची रॉकी और रानी की प्रेम कहानी सध्या सोशल मिडियाबरोबरच मनोरंजन विश्वातही खुप चर्चा आहे. या सीनचे बरेच व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. अनेकांनी या सीनवर टिका देखील केली. आता यावर शबाना यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

किसिंग सीनबद्दल शबाना म्हणतात की, “मला मुळीच वाटलं नव्हतं की या सीनमुळे इतका गोंधळ होईल. जेव्हा किसींग सीन मोठ्या पडद्यावर दाखवला जातो तेव्हा लोक खुश होतात. हा सीन पाहताना प्रेक्षक इमोशनल होतात. पण शूटिंगच्या वेळी अशी काही समस्या आली नाही. मी याआधी मोठ्या पडद्यावर जास्त किसिंग सीन दिलेले नाहीत हे नक्कीच! मात्र धर्मेंद्रसारख्या देखण्या माणसाला किस करायला कोणाला आवडणार नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT